Posts

Showing posts from January, 2021

विठुराया रुसलास की काय???

प्रिय विठुराया, पत्रास कारण की ... विचारपूस करावी म्हटलं , काय रे विठुराया रुसलास कि काय , यांदा वारी चुकली म्हणून रागावलास कि काय...? नाही जमलं रे यंदा यायला तुझ्या दारी , कोरोना पायी बंद  झाली देवळं सारी...सावळं तुझं रूप पाहण्या थांबतो वर्षभर जरी, यंदा मात्र चुकली तुझी हि वारी...नामघोषात दुमदुमते तुझी पंढरी ,यंदा मात्र सुनी झाली तुझी हि नगरी...तुझा गजर थांबला,तुझ्या नामाचा टाळहि हुकला..अरे सावळ्या विठूराया यंदा वारीचा हा सारा खेळहि फसला...पिढ्यां- पिढ्याची परंपरा आज मात्र खुंटली, तुझी वारी चुकली हि गोष्ट आम्हला नाही पटली...जशी ओढ लेकराला त्याच्या माय बापाची तशी ओढ आम्हा वारकर्यांना तुझी... यंदाच्या वारीचा योग चुकला आणि हा वारकरी तुझा रस्ता मुकला...तूच बाप बंधू तूच सखा , जगाचा कैवारी तू युगे युगे विटेवर उभा...पंढरपूर हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यसमोर उभी राहते ती चंद्रभागा ,वाळवंटात जमलेलो आम्ही वारकरी , आठवते ती पायी निघालेली वारी... शेकडो वारकरयांचा प्रवास , प्रत्येकाच्या ओठी फक्त तुझं नाव...पंढरीच आहे आम्हा वारकऱ्यांचं गाव...एकदा का तुझी वारी सुरु झाली कि तुझा नाद घुमू लागतो , माउली मा