विठुराया रुसलास की काय???

प्रिय विठुराया,

पत्रास कारण की ... विचारपूस करावी म्हटलं , काय रे विठुराया रुसलास कि काय , यांदा वारी चुकली म्हणून रागावलास कि काय...? नाही जमलं रे यंदा यायला तुझ्या दारी , कोरोना पायी बंद  झाली देवळं सारी...सावळं तुझं रूप पाहण्या थांबतो वर्षभर जरी, यंदा मात्र चुकली तुझी हि वारी...नामघोषात दुमदुमते तुझी पंढरी ,यंदा मात्र सुनी झाली तुझी हि नगरी...तुझा गजर थांबला,तुझ्या नामाचा टाळहि हुकला..अरे सावळ्या विठूराया यंदा वारीचा हा सारा खेळहि फसला...पिढ्यां- पिढ्याची परंपरा आज मात्र खुंटली, तुझी वारी चुकली हि गोष्ट आम्हला नाही पटली...जशी ओढ लेकराला त्याच्या माय बापाची तशी ओढ आम्हा वारकर्यांना तुझी... यंदाच्या वारीचा योग चुकला आणि हा वारकरी तुझा रस्ता मुकला...तूच बाप बंधू तूच सखा , जगाचा कैवारी तू युगे युगे विटेवर उभा...पंढरपूर हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यसमोर उभी राहते ती चंद्रभागा ,वाळवंटात जमलेलो आम्ही वारकरी , आठवते ती पायी निघालेली वारी... शेकडो वारकरयांचा प्रवास , प्रत्येकाच्या ओठी फक्त तुझं नाव...पंढरीच आहे आम्हा वारकऱ्यांचं गाव...एकदा का तुझी वारी सुरु झाली कि तुझा नाद घुमू लागतो , माउली माउली म्हणत तुझ्या दारी आम्ही पायीच येतो..वारीत जरी सोसल्या  उन्हाच्या झळा,सावली बनून आमच्या पाठीशी उभा रहरणारा आमचाच तू विठू सावळा...या वर्षी वारी होऊ शकली नाही याचं दुःखच आहे पण आमच्यापेक्षा जास्त दुःख तुला झालय...जेवढी भक्ती आमची तुझ्यावर आहे तेवढंच प्रेम तुझं आम्हा भक्तांवर आहे...वारीच्या प्रवासात मरण आलं तरी बेहत्तर पण तुझी वारी नक्की  करणार, अर्ध्या वारीतून कधीच मागे नाही फिरणार... वारी साठी पाहिलं पाऊल पडतं तेव्हा तुझा विचार येतो... मनालाच समजत नाही हा भक्ती भाव कुठून येतो..? विठ्ठल विठ्ठल म्हणत तुझ्या नामात गुंग होईन,तुझ्या पायाशी घर करून राहीन....वैकुंठात जाईन कि नाही माहित नाही... मिसळलो तर तुझ्या पंढरीच्या मातीत मिसळून जाईन... 

तुझाच वारकरी

Comments

Unknown said…
अप्रतिम 👌☺️

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....