श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...


श्रीमान योगी.... नावातच आदर दिसतो...आणि आदर का नसावा...श्रीमान योगी - आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण. पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते तो महापुरुष म्हणजे स्वराज्य जनक छत्रपती शिवाजी महाराज...

सध्याची पिढी मोबाईल मध्ये गुंतली आहे...मी पण असाच मोबाईल मध्ये गुंतून असतो...सहजच घरातल्या एका ड्रॉवर मध्ये मला हे पुस्तक दिसलं, बरेच दिवस वाचायची इच्छा होती पण या मोबाईलच्या जाळ्यातून वेळ कुठे मिळतो...आज मात्र वेळ काढलाच आणि श्रीमान योगी हाती घेतलं...पहिलीच ओळ नजरेस पडली....

निश्र्चयाचा महामेरू| बहुत जनांसी आधारु
अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी

छत्रपती शिवाजी महाराजांचे रूप आपल्याला थक्क व्हायला लावते, इतका अष्टपैलू, अष्टावधानी,आदर्श राज्यकर्ता थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी,परमधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टी असणारा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे अशक्य आहे...श्रीमान योगी वाचत असताना खरंच उर भरुन येतो...त्याची कहाणीच वेगळी,कर्तुतुव तर अभाळाला ही लाजवेल येवढं मोठं, स्वाभिमान आणि अभिमान काय असतो हे आपल्या राज्याच्या नावातच पाहायला मिळतं...

अनेक पुस्तकं वाचली पण श्रीमान योगी मधलं छत्रपतींचे वर्णन म्हणजे कमालच...इतकं सुंदर लिखाण आणि त्यात प्रत्येक वाक्यात जीव आल्यासारखं वाटतं असं वाटतं जणू काही मी राजेंच्या दरबारात बसून शिवकाळ अनुभवतोय...प्रत्येक वाक्यात मला छत्रपती आणि जिजाऊ दिसत होत्या...प्रत्येक मावळा नजरेसमोर दिसत होता...मला दिसत होता तो सह्याद्री, मला दिसत होता तो स्वराज्य , मला दिसत होता तो ताठ मानेनं वाऱ्याच्या झोकात फडकणारा भगवा....

खरच आयुष्यातला अद्भुत अनुभव या पुस्तकातून मला वाचण्यात मिळाला... छत्रपतींचे बालपण ते त्यांचा कार्यकाळ हा मला या पुस्तकातून अनुभवायला मिळाला...प्रत्यक्षात महाराजांचा दरबार पाहण्याचे नशीब नव्हते पण श्रीमान योगी या पुस्तकाच्या माध्यमातून का होईना छत्रपतींचा सहवास रणजित देसाई यांच्या लेखनातून अनुभवला...प्रत्येक वाक्यात इतिहासाचे वारे वाहत असल्याचा भास झाला...प्रतेक शब्दात महाराजांचे रूप डोळ्यासमोर येत होतं...आऊ जिजाऊ शहाजी राजे आणि प्रत्येक मावळा सोबत असल्याचा भास होत होता...एका थोर पूर्षाची यशोगाथा वाचणे म्हणजे भाग्याचं म्हणावं...कारण नुसतं वाचून कोणाचं कर्तूतुव समजत नाही तर त्या वाचनातून ते कर्तुत्व नजरेसमोर यायला हवं...

काहीच पानं वाचून झाली आहेत अजून पुढची काही पानं बाकी आहेत..श्रीमान योगी आणि माझा हा प्रवास आता न थांबणारा....



Comments

Popular posts from this blog

ती आणि....

असावं कुणीतरी....