'इतिहास' इतिहास जमा....?
इ.स 6 जून १६७४ रोजी स्वराज्याची स्थापना झाली...मुघलांच्या दडपशाही विरोधात अनेकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला... वेदशी व्यापारी भारतात येऊन व्यापार करण्याच्या हेतूने आले.परंतु त्यांचा हेतू व्यापार करण्याचा नव्हताच कधी...हेतू होता तो फक्त राज्य करण्याचा....अफगाणी, पोर्तुगीज, मुघल सलतनत सर्वांची भारतावर नजर होती... 17 व 18 वे शतक म्हणजे महाराष्ट्रातील योद्यांच्या पराक्रमाची गाथा म्हटली जाते.नरवीर तानाजी मालुसरे,कोंडाजी फर्जंद,रायाजी बांदल,बहिर्जी नाईक,बाजीप्रभू देशपांडे,फुलाजीप्रभू देशपांडे,जीवा महाला,शिवा काशिद असे कित्येक अगणीक सूर्य या मराठी मातीत सूर्योदयाला आले...प्रत्येकाचा एकच ध्यास ' स्वराज्य '... प्रत्येक जण झटला तो मराठी अस्मिता जागी आणि जिवंत ठेवण्यासाठी.... आऊ जिजाऊंच्या स्वप्नाला खरं ठरवण्यासाठी प्रत्येक मावळा आपल्या राजाच्या खांद्याला खांदा लावून तयारच होता... स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्याने त्याचा जीव राज्यांसाठी ओवाळून टाकला होता.... 19 फ्रेबुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज या क्रांतीसूर्याचा जन्म झाला. शिवबाच्या जन्माने साडेतीनशे वर्षांच्या काळ्या...