'इतिहास' इतिहास जमा....?

इ.स 6 जून १६७४ रोजी  स्वराज्याची स्थापना झाली...मुघलांच्या दडपशाही विरोधात अनेकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला... वेदशी व्यापारी भारतात येऊन व्यापार करण्याच्या हेतूने आले.परंतु त्यांचा हेतू व्यापार करण्याचा नव्हताच कधी...हेतू होता तो फक्त राज्य करण्याचा....अफगाणी, पोर्तुगीज, मुघल सलतनत सर्वांची भारतावर नजर होती...

17 व 18 वे शतक म्हणजे महाराष्ट्रातील योद्यांच्या पराक्रमाची गाथा म्हटली जाते.नरवीर तानाजी मालुसरे,कोंडाजी फर्जंद,रायाजी बांदल,बहिर्जी नाईक,बाजीप्रभू देशपांडे,फुलाजीप्रभू देशपांडे,जीवा महाला,शिवा काशिद असे कित्येक अगणीक सूर्य या मराठी मातीत सूर्योदयाला आले...प्रत्येकाचा एकच ध्यास ' स्वराज्य '... प्रत्येक जण झटला तो मराठी अस्मिता जागी आणि जिवंत ठेवण्यासाठी.... आऊ जिजाऊंच्या स्वप्नाला खरं ठरवण्यासाठी प्रत्येक मावळा आपल्या राजाच्या खांद्याला खांदा लावून तयारच होता... स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्याने त्याचा जीव राज्यांसाठी ओवाळून टाकला होता....

19 फ्रेबुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज या क्रांतीसूर्याचा जन्म झाला. शिवबाच्या जन्माने साडेतीनशे वर्षांच्या काळ्याकुट्ट अशा मोगल, आदिलशहा, सिद्दी यांच्या जुलूमी राजवटीचा काळा काळ सुरू झाला....शिवनेरीवर प्रत्येकाच्या कानी पहिली किंकाळी पडली...खरतर ती किंकाळी नव्हती तर ती वाघाची डरकाळी होती....आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात शिवबा वाघ जन्माला...दख्खन पासुन ते दिल्ली पर्यंत एकच गाजावाजा होता, 'शहाजी को पुत्र प्राप्त हुआ' संपूर्ण मुघली साम्राज्यात एकच वादळ घोंगावत होतं ते म्हणजे शिवाजी राजे भोसले

आपल्या राज्याचं राजपण किती मोठं होतं हे नव्याने सांगायची गरज नाही कारण प्रत्येकाच्या घरात शिवबा जन्माला यावा असं थोर कर्तुत्व होतं...स्वराज्यातील प्रत्येक माऊली राज्याला आपलच लेकरू मानत होती...राज्याची कीर्ती आणि महती होतीच तशी...ना जात भेद केला कधी ना कधी दूजाभाव प्रत्येकाला राजानं माणूसच म्हणून पाहिलं....प्रत्येकाशी भाऊ बांधिलकी जपली...

आपल्या राजाची कीर्ती एवढी थोर होती की शत्रूला देखील त्याच्या जाण्याने खंत वाटली...ज्या औरंगजबाने महाराष्ट्र काबीज करण्याचे स्वप्न पाहिलं त्याची महाराष्ट्रात येण्याची कधी हिम्मत नाही झाली....पण त्या औरंग्याच्या नशिबी काय वाढलं होतं हे ईश्वराला माहीत...कारण या नराधम औरंग्याची कबर आपल्या या मराठी मातीतच गाढली गेली...

आपल्या राजानं कधी जातीभेद करून राजकारण केलं नाही...पण खरी खंत तर याची वाटते जेव्हा राजाचं नाव घेऊन राजकारण करतायत....ज्या गडकिल्ल्यांनी सह्याद्री शाबूत ठेवला आज त्याच गाडकिल्ल्यांना शाबूत ठेवायला एकही पाऊल पुढे येत नाही...ज्या तटबंदी ने शत्रूला घाम फोडला आज तीच तटबंदी उभारायला घाम फुटावा हे दुर्दैव....ज्या माणसाने स्वाभिमान शिकवला तोच स्वाभिमान आपण गमावतो आहोत याचा विसर पडतोय....ज्या किल्ल्यांचा इतिहास अंगावर शहारे आणतो तेच किल्ले इतिहास जमा होणार हे निश्चित..


गडकिल्ल्यांच्या झालेल्या दुर्दशेकडे पाहून एक प्रश्न मनात येतो, किल्ले फक्त आता पुस्तकातच पाहिला मिळणार का? खरंच आता नुसता विचार करणं गरजेचं नाही तर गरज आहे या ऐतेहासिक वास्तू जतन करण्याची.....कारण इतिहास आता इतिहासात जमा होण्याची वेळ आली आहे 

Comments

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....