असावं कुणीतरी....
सहज तिने विचारलं काय रे एकटाच का बसला आहेस???
मी म्हणालो.....,
असावं कुणीतरी...आपल्याला समजून घेणारं..
असावं कोणीतरी... आपण चुकल्यावर आपल्याला समजावून सांगणारं
असावं कोणीतरी... आपण अडखळल्यावर आपल्याला सावरणारं
असावं कोणीतरी... आपल्याला आपलसं वाटणारं....
त्यावर ती म्हणते कशी...
आहे ना मी का तू एकटा बसतोयस?
मी असताना सुद्धा एकटा का सोसतोयस?
सांगितलं होता तुला कधी ही आवाज दे मला
बोल ना तू माझ्याशी, कशाला शोधतोयस ह्याला त्याला....
मी दुख:त असले कि चेहरा तुझा पडतो
तुझा त्रासलेला आवाज मलासुद्धा कळतो...
Comments
मी सोबत असून सुद्धा एकटा का सोसतोयस?
शेवटची ओळ ❤️