ती आणि....

तिचं माझ्याशी रोज बोलणं...काही दिवस मात्र आम्ही दोघं ही गप्पच होतो...कारण माहित नाही...कदाचित ती तिच्या कामात आणि मी माझ्या कामात व्यस्त होतो...सहज आज बोलणं झालं, एका meme वरून आमचा संवाद सुरू झाला...माझं मध्येच तिच्याशी न बोलणं तिला खटकत असायचं...कारण रोजची सवय अचानक तुटावी आणि संपूर्ण रंगलेली मैत्री क्षणात विस्कटावी...आमची मैत्री इतकी घट्ट की माझ्या चुकांवरून पांघरून घालून माझी समजूत घालून तिनेच मला मिठी मारावी... तिला माझ्याकडून कसली ही अपेक्षा नाही,तिला फक्त गरज आहे ती माझ्या सहवासाची,आपुलकीची आणि प्रेमाच्या चार शब्दांची...नशीब लागतं अशी मैत्रीण मिळायला जिच्या सहवासात संपूर्ण आयुष्य मिळतंय जगायला....

चेहऱ्याच्या हाव भावतून मनातले भाव ओळखून "काय झालं सगळं ठीक आहे ना?" असं हक्काने विचारणारी ती...आज मात्र तिच्या मनातले भाव न ओळखू पाहणारा मी...तिच्या ही मनाला वाटत असेल कुठे तरी आपल्या मनातलं कोणीतरी ओळखावं कधीतरी....नकळत येणाऱ्या अश्रूंना रोखून धरावे कुणीतरी....तिला ही वाटतं मिश्किल हसणं पुन्हा खुलू दे तिच्या गालावरी...तीच जाणते जखमा झालेल्या तिच्या हृदयावरी....

कर्तव्याची ओझी बजावताना स्वप्नांची शिदोरी मात्र तिने कधी उघडलीच नाही...सर्वांची मन राखण्यात आयुष्य जिझवत बसलीय, पण तिच्या मनाची कोणाला पडलीय???... तिला ही त्रास होतो हे दिसतं आम्हाला पण तिला होणारा त्रास कधी जाणवतो का कोणाला??? ती बोलत नाही,ती व्यक्त होत नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की तिला भावना नाही..ती व्यक्त होते ती ही बोलते,पण शब्दातून नाही तर डोळ्यातल्या पाण्याने ती व्यक्त होते...एक मैत्रीण म्हणून तिची मला गरज आहे पण सध्या आपण तिला समजून घेण्याची गरज आहे....

Comments

Unknown said…
अप्रतिम...शेवटची ओळ खूप भारी❤️

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

असावं कुणीतरी....