Posts

Showing posts from April, 2022

जातकारण....

सर्वप्रथम माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी काही ही संबधंध नाही..... काल पासून एक भाषण जोरदार गाजतय...टीका टिप्पणी ही सुरू झालीय...राजकीय वर्तुळातही त्याचा प्रभाव पाहायला मिळतोय...अनेक पक्ष स्वार्थासाठी एक होतात आणि त्या स्वार्थापोटी चिरडला जातोय तो सामान्य माणूस.... जातीयवाद कधी संपेल असं वाटत नाही कारण जो पर्यंत आपण रंगावरून धर्म शोधत बसू तोपर्यंत हे वाद असेच सुरू राहणार आहेत...प्रत्येकाने एकच विचार करायला हवा की आपला देश हाच आपला धर्म आहे "भारतीय"...गर्वाने सांगतो की अभिमान आहे भारतीय असल्याचा....मग हा अभिमान निवडणुकीच्या वेळी कुठे जातो...? मत मागायला हात पसरता मग जेव्हा मदत लागते तेव्हा पाठ का दाखवता? कुठल्याही धर्मावर बोलण्याचा अधिकार आपल्यातल्या कोणालाच नाही आहे...आणि हा निर्बंध संविधानाने आपल्याला घातलाय...काही विकृतांचा निषेध आपण सगळेच करतो परंतु त्यात इतर सामन्यांची काय चूक आहे...एका व्यक्तीमुळे आपण सर्वांना दोषी ठरवतो हे योग्य आहे का? परप्रांतीय आपल्या राज्यात येतात याचा राग द्वेष संताप दाखवता,अरे ते लोक आपल्या राज्यात येऊन धंदा करू शकतात मग आपण का नाही करू शकत याची लाज