जातकारण....
सर्वप्रथम माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी काही ही संबधंध नाही..... काल पासून एक भाषण जोरदार गाजतय...टीका टिप्पणी ही सुरू झालीय...राजकीय वर्तुळातही त्याचा प्रभाव पाहायला मिळतोय...अनेक पक्ष स्वार्थासाठी एक होतात आणि त्या स्वार्थापोटी चिरडला जातोय तो सामान्य माणूस....
जातीयवाद कधी संपेल असं वाटत नाही कारण जो पर्यंत आपण रंगावरून धर्म शोधत बसू तोपर्यंत हे वाद असेच सुरू राहणार आहेत...प्रत्येकाने एकच विचार करायला हवा की आपला देश हाच आपला धर्म आहे "भारतीय"...गर्वाने सांगतो की अभिमान आहे भारतीय असल्याचा....मग हा अभिमान निवडणुकीच्या वेळी कुठे जातो...? मत मागायला हात पसरता मग जेव्हा मदत लागते तेव्हा पाठ का दाखवता?
कुठल्याही धर्मावर बोलण्याचा अधिकार आपल्यातल्या कोणालाच नाही आहे...आणि हा निर्बंध संविधानाने आपल्याला घातलाय...काही विकृतांचा निषेध आपण सगळेच करतो परंतु त्यात इतर सामन्यांची काय चूक आहे...एका व्यक्तीमुळे आपण सर्वांना दोषी ठरवतो हे योग्य आहे का?
परप्रांतीय आपल्या राज्यात येतात याचा राग द्वेष संताप दाखवता,अरे ते लोक आपल्या राज्यात येऊन धंदा करू शकतात मग आपण का नाही करू शकत याची लाज वाटायला हवी....आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना परप्रांतीय म्हणून हकलवून लावायचा अधिकार आपल्याला कोणी दिलाय? प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहेच की...आणि राहिला प्रश्न त्यांना परतवून लावायचा, त्यांच्याकडे भारतीय असल्याचा पुरावा आहे आणि ते संपूर्ण भारतात कुठे ही वावरू शकतात हा ही हक्क त्यांना त्याच संविधानाने दिलाय...आणि संविधानाने दिलेला हक्क कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही.....भारतातील अनेक जण प्रदेशात शिक्षण ,नोकरी साठी आहेत , त्यांना जेव्हा बेदखल केलं जाईल तेव्हा तुमचं रक्त उफाळून निघेल मग तेव्हा ते भारतीय असतील त्यात कोणता जात पात नसेल...मग हाच भेदभाव देशवासीयांच्या बाबतीत का?
सर्वसामन्य नेतेमंडळींना निवडून देतात ते देशाची प्रगती होण्यासाठी....पण हे सर्व जातीयवाद संपवून एक माणुसकीचा धर्म सर्वांनी पाळला तर ते येणाऱ्या भावी पिढीच्या भवितव्य ठरवण्यासाठी मोलाचं ठरेल नाहीतर येणारी पिढी सुद्धा जातीयवादात अशीच चिरडली जाईल....
टीप :- माहित आहे बऱ्याच जणांना हे पटणार नाही...काही जण माझ्या आई बहिणीची आठवणही काढतील...मला त्याचा काही फरक पडत नाही कारण ज्या संविधानाच्या बळावर तुम्ही मत मांडायला मोकळे आहात तसच हा विचार मांडण्याचं स्वातंत्र्य पण मला याच संविधानाने दिलंय....
कलम 19 नुसार प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे...ज्यात भाषा आणि विचारांचं स्वातंत्र्य दिलं आहे....
Comments