भेट.....
नशिबात काय वाढलेलं असतं हे कोणालाच ठाऊक नसतं...कधी कसं केव्हा कुठे कोणाची भेट होईल हे ही सांगता येत नाही... असच काहीसं माझ्या आणि तिच्या बाबतीत घडलं असावं....2 वर्षांपूर्वी आमची शेवटची भेट झाली वाटलं नव्हतं की पुन्हा आम्ही कधी भेटू...कारण माझ्या एका चुकीमुळे आम्ही दोघं पण लांब गेलो...यात तिची काही चूक नव्हती... म्हंटले आता पुन्हा आमची भेट होणे नाही.... 2 दिवसांपूर्वी अचानक तिचा फोन आला,मी जरा विचारात पडलो की आज कसा काय हीचा फोन आला....आणि 2 वर्षांपूर्वी संपलेला संवाद पुन्हा सुरू झाला...तिचा आवाज ऐकताच जरा हिरमुसून गेलो कशासाठी फोन केला हे कळण्याआधीच मनात विचार आला की लग्नाचं आमंत्रण तर नसेल ना मी काही बोलण्याआधी समोरून तिनेच विचारलं कुठे आहेस मी शांतपणे म्हंटले गावी आहे...मी गावी आहे ऐकताच ती तारकर्ली मध्ये आहे असं सांगितलं मी विचार न करता भेटुयात असं म्हटलं खरतर माझ्या गावापासून तारकर्ली 270 किलोमीटर वर आहे...कसला ही विचार न करता मी थेट तिला भेटायला गेलो.... साडे चार तासांच्या प्रवासात तिचेच विचार मनात येत होते... म्हंटले भेटून सगळं तिला सांगावं....पण तिची भेट झाल्यानंतर स...