भेट.....

नशिबात काय वाढलेलं असतं हे कोणालाच ठाऊक नसतं...कधी कसं केव्हा कुठे कोणाची भेट होईल हे ही सांगता येत नाही... असच काहीसं माझ्या आणि तिच्या बाबतीत घडलं असावं....2 वर्षांपूर्वी आमची शेवटची भेट झाली वाटलं नव्हतं की पुन्हा आम्ही कधी भेटू...कारण माझ्या एका चुकीमुळे आम्ही दोघं पण लांब गेलो...यात तिची काही चूक नव्हती... म्हंटले आता पुन्हा आमची भेट होणे नाही....

2 दिवसांपूर्वी अचानक तिचा फोन आला,मी जरा विचारात पडलो की आज कसा काय हीचा फोन आला....आणि 2 वर्षांपूर्वी संपलेला संवाद पुन्हा सुरू झाला...तिचा आवाज ऐकताच जरा हिरमुसून गेलो कशासाठी फोन केला हे कळण्याआधीच मनात विचार आला की लग्नाचं आमंत्रण तर नसेल ना मी काही बोलण्याआधी समोरून तिनेच विचारलं कुठे आहेस मी शांतपणे म्हंटले गावी आहे...मी गावी आहे ऐकताच ती तारकर्ली मध्ये आहे असं सांगितलं मी विचार न करता भेटुयात असं म्हटलं खरतर माझ्या गावापासून तारकर्ली 270 किलोमीटर वर आहे...कसला ही विचार न करता मी थेट तिला भेटायला गेलो.... साडे चार तासांच्या प्रवासात तिचेच विचार मनात येत होते... म्हंटले भेटून सगळं तिला सांगावं....पण तिची भेट झाल्यानंतर सगळं काही विसरून गेलो ...

तिला पाहताच मनाची घालमेल सुरू झाली...काय बोलायचं कसं बोलायचं हे सुचत नव्हतं कारण माझ्या चुकीमुळे ती माझ्यापासुन लांब गेली होती....मी बोलण्याआधी तिनेच येऊन मिठी मारली मी जरा चक्रावून गेलो....कारण 2 वर्षांनी झालेली भेट ही इतकी आनंद देऊन जाईल वाटलं नव्हतं...तिची सततची बडबड पुन्हा कानावर पडू लागली...आणि नकळत माझं मिश्किल हसणं पुन्हा खुलू लागलं.... तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्या आयुष्यातला पुन्हा अविस्मणीय क्षण ठरत होता...

हातात हात घेऊन लाटांचा आनंद दोघेही घेत होतो...माझ्या मनाची त्यावेळी झालेली घालमेल ना तिला सांगू शकत होतो ना स्वतःला समजावू शकत होतो....जसा मी तिचा हात पकडला माझ्या हृदयाची स्पंदने अजून वाढत गेली...जितका वेळ आम्ही सोबत होतो तेवढा वेळ क्वचित आम्ही एकत्र घालवला असावा...आमच्या नात्यातला दुरावा हा माझ्यामुळे झाला आणि हे मी मान्य ही करतो....आणि याची कबुली देखील मी तिला दिली...भेटता क्षणी भाव माझ्या डोळ्यातून अश्रू संगे येणार तितक्यात सावरलं, कारण माझ्या डोळ्यातल्या अश्रूंची तिला सवय नव्हती...उगाच कशाला तिच्या आनंदात विरजण घालायचं म्हणून स्वतःला सावरलं आणि एकमेकांच्या आनंदात सहभागी झालो....मला कळत होतं तिची घालमेल होतेय पण मी बोलू शकत नव्हतो कारण त्याला कारणीभूत मीच होतो....निघताना मात्र माझा पाय तिकडून निघत नव्हता कारण तिच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण हे मला हवे होते आणि अजून जगायचे होते....अजूनही मी तिच्यावर तेवढंच प्रेम करतो जेवढं आधी करत होतो...निघताना संपूर्ण प्रवासात तिचा चेहरा आणि घालवलेले सर्व क्षण हे डोळ्यासमोर येत होते...म्हणून तिला काही ना काही कारण काढून सतत फोन करत होतो....आता पुन्हा आमची भेट कधी होतेय याची वाट पाहतोय.....

Comments

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....