हरवलेलं ते हास्य...
हरवलेली एखादी गोष्ट पटकन सापडते,पण हरवलेलं हास्य कधीच सापडत नाही...विचारून पाहावं कधी त्याला ज्याचं हास्य त्याच्यासाठी सर्व काही होतं... एखाद्याचं शांत बसणं आपल्याला परवडेल पण हास्याचे केलेलं सोंग कधीच नाही...स्वतःला प्रश्न विचारून पहा कधी,समोरची व्यक्ती खरच हस्तेय की देखावा करतेय...आयुष्य आपलं जोकर सारखं झालंय, स्वतः दुःखाच्या सागरात बुडून इतरांना हास्याच्या लाटांचा आनंद देतोय...खरच हसणं जेवढं सोप्प समजतो तेवढं सोप्प नाही आहे...डोळ्यात अश्रू दाटले असले तरी ते लपवता आले पाहिजेत,नाही का?