एक फोन कॉल...
एक फोन कॉल आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरतो,कारण sms करणं त्यावर ईमोजी पाठवणं याने खरच भावना व्यक्त होतात का?
भावना व्यक्त होण्यासाठी आपल्याला बोलावं लागतं... आपली जवळची व्यक्ती आपल्यावर कितीही रुसलेली असली तरी त्याच्याशी एकदा आपण फोन वर बोलून घ्या आणि जर ती आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ असेल तर तिच्याशी भेटून बोला...वाद कमी करण्याचं एकच मध्यम आहे ते म्हणजे संवाद..आपण हक्काने एखाद्यावर नाराज होतो मग त्याच हक्काने त्याला फोन करा आणि व्यक्त व्हा...मग बघा तुमच्या आणि त्याच्या नात्याला पुन्हा नवी पालवी फुटलेली असेल
Comments