जात

'जात' हा शब्द जरी ऐकलं ना तर तळपायाची आग मस्तकात जाते.हल्ली आडनाव पाहून माणसाची जात ओळखली जाते...त्यावरूनच त्यांचा धर्म ओळखला जातो...जरी आपण 21व्या शतकात असलो तरीही अजून आपण पुरोगामी विचारांनीच जखडलो गेलोय..माणूस नाही तर सध्या जात महत्वाची ठरते...अपडेटेड मोबाईल वापरतो कारण जुनं version outdated झालेलं असतं, मग नवीन विचार का आपण आमलात आणत नाही...
 आडनाव फक्त एक ओळख करून देण्यासाठी आहे...तरी देखील लोकांची मानसिकता अजूनही पुरोगामी विचारात अडकली आहे...एकीकडे आपण सर्व धर्म समभाव मोठ्यापणाने सांगतो...पण वेळ जेव्हा आपल्यावर येते तेव्हा मात्र आपण शांत असतो...कोणाला दोष द्यायचा हेतू नाही माझा , पण पाहिलं तर बऱ्याच गोष्टी आहेत...जात गोत्र धर्म या सगळ्या गोष्टींनी आपल्याला जखडलंय...आता खरच वेळ आहे ती पुरोगामी विचारांच्या पलीकडे पाहण्याची...स्वतः पुढाकार घेऊन या सर्व गोष्टी विसरून एक जुटीने राहण्याची गरज सध्या भासतेय...मी तर जातीयवादाचा विरोधात आहे ,अन तुम्ही???
  

Comments

पुरोगामी म्हणजे काय अगोदर हे सांग...? आणि त्याच्यापलिकडे तुला काय दिसतंय आणि वाटतंय..?

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....