नवसंजीवनी...
हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. मारुतीच्या अनेक शौर्य गाथा अजूनही आजही अनेकांच्या मनात कोरल्या गेल्यात...ज्यावेळी रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि लंकेला घेऊन गेला त्यावेळेस सीतेला परत आणण्यासाठी वानरसेना सज्ज झाली..सीतेला परत आणण्यासाठी अनेक आव्हानं रामासमोर उभी ठाकलेली... सर्व आव्हानांना सामोरं जाण्यासाठी रामसोबत खंबीर पणे उभा होता तो हनुमान... ज्यावेळी रावण आणि राम यांच्यात युद्ध घडलं त्यावेळी लक्ष्मणाला बाण लागला आणि तो बेशुद्ध पडला , सर्व देव ऋषीमुनी एकजूट झाले परंतु कोणालाच लक्ष्मणाला शुद्धीवर आणता आलं नाही...सर्व देव तिथे उपस्थितीत असूनही एकाही देवाला लक्ष्मणाला शुद्धीवर आणणं जमलं नाही..तेव्हड्यात एक ऋषी उठले आणि त्यांनी उत्तरेच्या बाजूला द्रोणागिरी पर्वत आहे त्यावर मिळणारी संजीवनी हीच लक्ष्मणाला वाचवू शकते असं सांगितलं हनुमानाने कुठलाही विचार न करता लगेच उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्...