नवसंजीवनी...

हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता.

मारुतीच्या अनेक शौर्य गाथा अजूनही आजही अनेकांच्या मनात कोरल्या गेल्यात...ज्यावेळी रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि लंकेला घेऊन गेला त्यावेळेस सीतेला परत आणण्यासाठी वानरसेना सज्ज झाली..सीतेला परत आणण्यासाठी अनेक आव्हानं रामासमोर उभी ठाकलेली... सर्व आव्हानांना सामोरं जाण्यासाठी रामसोबत खंबीर पणे उभा होता तो हनुमान...

ज्यावेळी रावण आणि राम यांच्यात युद्ध घडलं त्यावेळी लक्ष्मणाला बाण लागला आणि तो बेशुद्ध पडला , सर्व देव ऋषीमुनी एकजूट झाले परंतु कोणालाच लक्ष्मणाला शुद्धीवर आणता आलं नाही...सर्व देव तिथे उपस्थितीत असूनही एकाही देवाला लक्ष्मणाला शुद्धीवर आणणं जमलं नाही..तेव्हड्यात एक ऋषी उठले आणि त्यांनी उत्तरेच्या बाजूला द्रोणागिरी पर्वत आहे त्यावर मिळणारी संजीवनी हीच लक्ष्मणाला वाचवू शकते असं सांगितलं हनुमानाने कुठलाही विचार न करता लगेच उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्वतावर त्या ला हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले.

 तात्पर्य एवढंच की सर्व देव तिथे उपस्थित असूनही लक्ष्मणाला वाचवू शकले नाहीत,शेवटी त्यांना जडी बुटीचाच आधार घ्यावा लागला...सध्या कोरोनाच्या काळात कोरोना रुग्ण हे वास्तवातील लक्ष्मण झालेत त्यांना आता गरज आहे ती नैसर्गीक संजीवनिची ते म्हणजे ऑक्सजिन....आपण निसर्गाचं संवर्धन करतोय की त्याचा ऱ्हास करतोय याचं उत्तर आपल्याकडे आहे का? कारण आताच्या घडीला गरज आहे ती म्हणजे ऑक्सिजन ची एकीकडे आपण सांगतोय की झाडे लावा झाडे जगवा पण आपण नेमकी झाडं किती जगवली... रोज होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आता वास्तवातील लक्ष्मणाच्या जीवावर बेतलाय...गरज आहे ती एक पाऊल निसर्गच्या संवर्धनाची...गरज आहे ती निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबवण्याची... गरज आहे ती वास्तवातील लक्ष्मणाला संजीवनीची...देवांच्या रूपाने झटणारे डॉक्टर आता हतबल झालेत,परिस्थिती संपूर्ण हाताबाहेर जातेय,आधीच प्राणवायूचा तुटवडा आणि त्यात वाढती कोरोना रुग्ण संख्या...चला मग आपण सगळे वास्तवातील हनुमान होऊ आणि वास्तवातल्या लक्ष्मणाला नवी संजीवनी देण्याच्या प्रयत्न करू...भविष्यात हीच संजीवनी मोलाची ठरणार आहे..दुर्दैव एवढंच की मोफत मिळालेली संजीवनी आज विकत घ्यावी लागतेय... 

Comments

अगदी खर आहे हे.... आपण शाळेत विज्ञान शिकताना शिकलो की पृथ्वीवर कोणता वायू किती प्रमाणात आहे ते... मात्र आहे ते प्रमाण तसेच राहण्यासाठी आपण काय करत आहोत हे खूप महत्वाचं आहे. आणि गरजेचं सुद्धा.. आताही आपण हातावर हात ठेवून बसून राहिलो तर मानव जीवन संपल्या शिवाय राहणार नाही... त्यामुळे हातावर हात घेऊन राहण्यापेक्षा हातात हात धरून धरा हरित करून टाकूया..

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....