खेळ प्रश्न उत्तरांचा...

खेळ प्रश्न उत्तरांचा

नाती गोती दूर लोटली गेली
स्वार्थापायी आपलीच माणसं दूर गेली

कधी आपलं,आपण ,आमचं म्हणणारे
आज माझं म्हणायला लागले

विसर पडला त्यांना जे अडचणीत त्यांच्या सोबत आले
विसरून ते दिवस आपला स्वार्थ पाहू लागले

काय सांगावं त्यांना जे माणुसकीच हरवून बसले

 आदळणाऱ्या लाटांचा स्पर्श जेव्हा किनाऱ्याला होतो,त्या किनाऱ्याच्या वेदना पाहून समुद्र पण ओहटीची भूमिका घेतो

 हल्ली माणसाला माणूस म्हणून कोण नाही पहात
त्याची फक्त पाहिली जाते जात

Sign of true love म्हणून ताजमहल ला पाहिलं जातं
Sign of friendship म्हणून राधा कृष्णाचं नातं का लपवलं जातं?

 समोरच्याच्या भावना आपण दुखवतो
त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायला आपण कधी जातो?


समोरच्याच्या चुकीवर आपण त्याला तत्वज्ञान शिकवतो
आपली चूक आपण कधी मान्य करतो?

 आपल्याला गरज असते तेव्हा समोरच्याला आपण मस्का मारतो
समोरच्याला गरज भासते तेव्हा आपण त्याला फाट्यावर मारतो....

Comments

Unknown said…
अप्रतिम.....

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....