शेवटच बाक :- एक आठवण

बऱ्याच वर्षांनंतर एका कामा निमित्त माझ्या शाळेत गेलो होतो.
शाळेच्या गेटवर डोळे जरा पाणावले होते...कारण पण तसाच होता...दहावी पास झाल्यावर निकाल घ्यायला गेलो ते शेवटच त्यानंतर कधी शाळेकडे वळून सुद्धा पहिला नाही...शाळेच्या मुख्य कार्यालायात गेलो....त्यांनी सांगितल कि madam ना यायला उशीर होणार आहे तुम्ही बाहेर बसा...
त्यांच्या येण्याची वाट बघत होतो..
तितक्यात काही शीपाई जुने बाकडे बाहेर काढून नवीन बाकडे वर्गांमध्ये ठेवत होते...
त्यातल्या एका मोडक्या बाक्ड्याला बघून आमचे दिवस आठवले...

शेवटच्या बाकावरची एक आठवण
त्यात साठली आहे संपूर्ण आयुष्याची साठवण

शेवटच्या बाकावरच्या आठवणी आठवल्या कि हसतो मनभरून
शेवटच्या बाकावरच्या आठवणी आठवल्या कि हसतो मन भरून
पण हसता हसता डोळे येतात भरून......

आठवतो तो शेवटचा बाकडा
आठवतो तो शेवटचा बाकडा
वर्गात लक्ष्य नसल्यावर मास्तर म्हणायचे वर्गाबाहेर हो माकडा

लास्ट बेन्चेर्स म्हणून आमची होती ख्याती
लास्ट बेन्चेर्स म्हणून आमची होती ख्याती
सगळ्या शिक्षकांच्या नजरेत आम्ही होतो उन्न्नाड कार्टी

दहावी नंतर बरीच वर्ष गेली सरून
दहावी नंतर बरीच वर्ष गेली सरून
त्यादिवशी शेवटचा बाकडा पाहिला होता दुरून...

कोणी विचारलं कि आयुष्यात काय हवाय
मी नीसंकोच होऊन नक्की सांगेन कि शाळेच्या शेवटचा बाकडा आणि त्या बाकड्यावरच्या आठवणी हव्यात

             

Comments

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....