माणसातला देव...
पत्र:- डाॅक्टर्स, नाही कसयं ना, या साऱ्या मोठ्या कोरोना नावाच्या आजारात अविरत दिनरात तुम्ही आमच्यासाठी राबताय ,आणि आम्ही नागरिक गेल्या काही दिवसांमधे बेजबाबदारपणे वागलोयं हो. पण तरी आमच्यातले जे चुकलेत त्यांना तुम्ही सावरलंय. केवळ आज डाॅक्टर्सच नाही तर सर्वजण किती मेहनतीने लढतायं. ती इटलीतली आर्मी जिवाची पर्वा न करता त्या मेलेल्या प्रेतांच्या विल्हेवाट लावण्यासाठी किती मोठी रिस्क घेतीये. आर्मी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी तुम्ही अगदी किती मोठ्या प्रमाणात तुमचं आयुष्य इतर इतक्या साऱ्या लोकांसाठी पणाला लावतायं, तुम्ही अगदी देवाच्या रूपात आलात अगदी सर्वचजण . तुम्ही ना कधी तुमच्या कुटुंबाची पर्वा केलीत ना इतर गोष्टी पाहिल्यात, तुम्ही ज्या हिमतीने लढतायं ना ती हिम्मत खरच दाद देण्यासारखी आहे राव. सध्या कुठला देश आणि कुठले लोकं,कुठलीच जात धर्म बघून काहीच होणारं नाही या आजाराने अगदी चपराक मारली . सर्व हे छोट्याछोट्या गोष्टींवर भांडत राहणाऱ्या देशातील असंख्य जनतेवर आणि यातच डाॅक्टर्सनी त्यांची भुमिका अगदी चोख बजावली लोकांसाठी, आणि ते बजावतायेत....