तुका कोणाला पटला?????
ना त्यावेळी कोणाला संतवाणी पटली....तुकारामाची कहाणीच खडतर अजूनही कोणाला कळली नाही...गाथा तुकोबारायांच्या इंद्रायणीत बुडविल्या...इंद्रायणीच्या उदरातून पुन्हा वर आल्या...कथा तुकोबारायांची युगे युगे आठविल्या...ते होते संत तुकोबा अंबाईल...कथा सारखीच या तुकोबाची मात्र कहाणी वेगळी...एका तुकारामास होती पंढरीची आस तर दुसरा कायद्याच्या भोगतोय त्रास...ही कहाणी आहे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची...15 वर्षांची कारकीर्द 14 वेळा बदल्या...एक अनोखा अनुभव त्यांच्या नशिबी...माणसाने आपल्या कर्तव्यात किती निष्ठावंत असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे..आपल्या कामाने असंख्य लोकांच्या मनात स्थान तर अनेकांच्या वाईट कामात असणारा अडथळा अशी ओळख असणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली...मनात एकच प्रश्न घोंगवतोय माणसाने कर्तव्यनिष्ठ असू नये का?
Comments