कोन म्हणतया....
कोन म्हणतया मला काय जमत नाही,, आयुष्याचा नागमोड्या वळणावर भावनांना डांबून ठीवनं जमलंय मला.....
मोकळा श्वास घेणं आता हळू हळू शिकतोय दावणीला बांधाया..
इथं नाही कोणाला पर्वा कुणाची....समद्याना काम हवं फकास्त मंग व्हत्यात मोकळी काम झाल्यावर निघून जायला...
मी बी आता मोजून मोजून जगू लागलो....
हसन्या आधी माझं हसू मोलून मापून बघू लागलो.....
भावनांचा सुर जवा गवसत न्हाय कुठं तवा मात्र,,,पेन आन कागुद असतो सोबतीला....
भावनांचा गाठोडा हळू हळू उत्रू लागतो कोऱ्या कागुदावर...लिहून झालेलं गाठोड मात्र अजून जमलं न्हाय घडी घालून ठेवाया.....
आयुष्याची गाठोडी बांधता बांधता...स्वप्नाची घडी मात्र इस्कटली....आठवणींची जमा पुंजी सोबत राहिली...माणुसकीची नाव मात्र भरकटली....
Comments