वरुणराजा का इतका कठोर झालाय

हे वरुणराजा इतका का कठोर झालाय रे....तुझ्या एका सरीची वाट पाहणारा आज मात्र तुझा तिरस्कार करतोय.....वर्षभराची मेहनत क्षणात कुसवतोयस...कापणी ला आलेलं पीक असच सडतय...तू बरसत नाही तू तर कोसळतोय.... ज्यांचं छत्र कौल आहे त्यांचं काही नाही....पण ज्यांचं छत्र आभाळ आहे त्यांचं काय....इतका कठोर नको होऊ रे...आधीच त्या कोरोनाने हतबल झालोय सारे त्यात तू असा बरसतोय....जगाचा पोशिंदा तुझ्यावर अवलंबून आहे रे...तू बरासलास तर सारं वर्ष सरतय...पण आता शेत पिकात पाणी साठलय...काय करावं आता तूच सांग...तुझ्या शब्दाला जागून वर्षभर मेहनत करायची आणि क्षणात येऊन त्याची तू अशी दिंडी काढायची.....? आभाळ सारं फाटलं ... शीवू कुठे आणि कस....?म्हणूनच का गावाकडचा माणूस शहराकडे वळला...तुझ्या ह्या भीती पोटी... सारं संसार विकून बसला....वर्षानुवर्ष जपलेली शेतजमीन एका क्षणात देऊन बसला.....तरी देखील शेतकरी आमचा हरला नाही...सवय झाली त्याला या सगळ्याची....आणि न हरण्याची....कर्ज काढून पीक उगवलं ...पंचनामे दूर साधी पाहणी भी नाय झाली....काय करावं त्याने ज्याच्या पोराचं शिक्षण सारं शेतीवर आहे....अरे का नाही लावणार फास गळ्याला .....ओसंडून तू कोसळणार अश्रू मात्र घरातल्यांचे निघणार...तुझा गडगडाट होणार तिकडे मात्र रडारड होणार....तू घेऊन येशील तो वादळ क्षणभराने थांबणार...शेतकऱ्याच्या घरावर आलेलं दुःखाचं वादळ ते केव्हा शांत होणार???? सांग बाबा आता तूच तू कधी शांत होणार???

Comments

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....