ती रोज सकाळी उठायची… आरशासमोर उभी राहायची… आणि अगदी अलगद… भाळी कुंकवाचा मळवट भरायची… पण गावात सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असायच्या… कारण — ती विधवा होती. “अगं, विधवा असूनही कुंकू लावते?” “काय गरज आहे या नाटकाची?” “काहीतरी गडबड आहे…” अशा कुजबुजीत तिचं आयुष्य गुंतलं होतं… पण ती मात्र शांत… निर्विकार… जणू काही काहीतरी जपते आहे… किंवा लपवते आहे… तिचं नाव होतं राधा. तीन वर्षांपूर्वी तिचा नवरा अनिकेत अचानक मेला… कसं मेला? कोणीच ठाम सांगू शकत नव्हतं… कोणी म्हणाले – अपघात… कोणी म्हणाले – आत्महत्या… आणि काहींच्या डोळ्यात तर एक वेगळीच भीती होती… त्या दिवशी… अनिकेतचं शव घरात आणलं तेव्हा, राधाने एकही अश्रू ढाळला नव्हता… फक्त शांतपणे त्याच्या कपाळावर हात फिरवला… आणि हळूच कुजबुजली… “मी थांबतेय… अजूनही…” गावातल्या लोकांना तेव्हा वाटलं — दुःखात बाई सुन्न झालीय… पण त्या दिवसापासून… ती रोज कुंकू लावायला लागली. एके रात्री… शेजारीण ताईने पाहिलं… राधा आरशासमोर उभी होती… पण तिच्या मागे… आरशात आणखी एक सावली दिसत होती… पुरुषाची. ताई घाबरून मागे सरकली… पुन्हा पाहिलं तर — राधा एकटीच होती. दुसऱ्या दिवशी,...
श्रीमान योगी.... नावातच आदर दिसतो...आणि आदर का नसावा...श्रीमान योगी - आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण . पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते तो महापुरुष म्हणजे स्वराज्य जनक छत्रपती शिवाजी महाराज... सध्याची पिढी मोबाईल मध्ये गुंतली आहे...मी पण असाच मोबाईल मध्ये गुंतून असतो...सहजच घरातल्या एका ड्रॉवर मध्ये मला हे पुस्तक दिसलं, बरेच दिवस वाचायची इच्छा होती पण या मोबाईलच्या जाळ्यातून वेळ कुठे मिळतो...आज मात्र वेळ काढलाच आणि श्रीमान योगी हाती घेतलं...पहिलीच ओळ नजरेस पडली.... निश्र्चयाचा महामेरू| बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचे रूप आपल्याला थक्क व्हायला लावते, इतका अष्टपैलू, अष्टावधानी,आदर्श राज्यकर्ता थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी,परमधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टी असणारा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे अशक्य ...
Comments