विचार...
विचार म्हटलं की मनात शंका कुशंका येतंच असतात...प्रामुख्याने विचार करत असताना बऱ्याचदा आपल्या डोक्यात शंकांचे वादळ घोंगावत असतं... याच दरम्यान अनेक प्रश्न मनात येत असतात...त्यावेळी वड्याचा सूड वांग्यावर काढणं हे स्वाभाविक होऊनही जातं.यात कधी वाद विवाद होत असतात त्या दरम्यान नाती जपणं अवघड होऊन बसतं...कित्येकदा वातावरण एवढं नाजूक होऊन बसतं की त्यावर नियंत्रण मिळवणं कठीण असतं... आयुष्याच्या वाटेवर खडतर प्रवास हा होतंच असतो आणि खडतर प्रवास भोगला नाही किंवा ज्याच्या वाटेला खडतर प्रवास आला नाही त्याचं जगणंच व्यर्थ मानावं लागेल...
अनेकदा आयुष्याचा समतोल राखणं अवघड होऊन बसतं यात मग काय करावं आणि काय नाही हे सुचतच नाही....अशावेळी मात्र निश्चिन्त बसून मनाला सावरत दीर्घ श्वास घ्यायचा आणि मार्ग काढायचा प्रयत्न करायचा...एकाच गोष्टीत अडकून राहण्यापेक्षा त्यातून बाहेर कसं निघता येईल याचा विचार करायला हवा....सुरवात थोडी अवघड होईल पण नक्कीच नंतरचा प्रवास हा उत्तम असेल......
Comments