सवय

एखाद्याची आपल्याला एवढी सवय होऊन बसते त्यावेळी आपल्याला सतत त्या व्यक्तीचा भास होत असतो...वेळोवेळी ती व्यक्ती आपल्यासोबत असावी असं वाटत असतं... नेहमीच ते शक्य नसतं....त्या व्यक्तीचा हवा असणारा सहवास ज्यावेळी मिळत नाही ना त्यावेळी होणारी घुसमट बेचेन करून सोडते...एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं चुकीचं असतं का? नाही म्हणजे आपण ज्या व्यक्तीसाठी घुटमळत असतो तीच व्यक्ती आपल्यापासून दूर जातेय हे पाहून मन अस्थिर होतं नाही का?...
 आपल्याला त्या व्यक्तीच्या सहवासाची सवय झालेली असते...पण अचानक ती सवय तुटते त्यावेळी आपण पूर्णतः खचून जातो...तरी देखील आपण समोरच्या व्यक्तीचाच विचार करत असतो...पण ती व्यक्ती आपला विचार करत असेल का हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो का....? नाही विचारत कारण आपल्याला समोरच्याचे मन कसं मारायचं हा प्रश्न पडतो ...त्याला काय वाटेल तो काय विचार करेल आशा अनेक प्रश्नांच्या गुंत्यात आपण अडकून जातो....आणि नंतर मग त्यातून बाहेर पडणे अवघड होऊन बसतं...
  मग अश्या परिस्थितीत आपण करायचं तरी काय...हातावर हात ठेवून शांत बसायचं का? अनेक प्रश्न आ वासून समोर उभे आहेत...त्यांची उत्तरं मात्र नाहीत...आयुष्याचा एवढा गुंता झालाय की त्यातून बाहेर पडणे आता मुश्किल होऊ लागलं आहे...मोठी माणसं नेहमी म्हणत असतात एखादी गोष्ट वाईट घडली ना की ते सहज म्हणतात की सवयीचे परिणाम , अगदी खरं आहे ते  कारण एखाद्याची सवय होऊन बसणं हेच नंतर त्रासदायक ठरतं....

  

Comments

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....