का कुणास ठाऊक
का कुणास ठाऊक....असा प्रश्न अनेकदा लोकांना पडत असतो यात तथ्य एवढंच की त्याचं उत्तर आपल्याकडे कधीच नसतं...एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात सहज घडून जाते....त्याचा आपण गांभीर्याने कधीच विचार करत नाही...समोरच्या व्यक्तीने आपल्याला विचारला की का असं घडलं त्यावर आपण सहज म्हणून जातो का कुणास ठाऊक ...मग आपल्याला ठाऊक तरी काय हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायला हवा ना...जो पर्यंत आपल्याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधत नाही तो पर्यंत आपल्याला त्याचं उत्तर मिळणारच नाही ना..
आपण आपल्या आयुश्यात प्रश्नांच्या मागे धावतो पण कधी त्यांच्या उत्तराचा पाठलाग करतो का ,तर नाही करत जो की आपल्याला करणं गरजेचं आहे...आयुष्याच्या वळणावर अनेक प्रश्न उधभवत असतात त्याची उत्तरं शोधायला आपण टाळाटाळ करतो...जर ते सोडलं ना तर खरच सर्व प्रश्न आपोआप सुटतील हे मात्र नक्की
Comments