पुन्हा बहरुदे कोकण माझा....

कोकण....असा प्रदेश जिथे निसर्गाचा बहुमूल्य ठेवा आहे...असा प्रदेश जिथे येणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेची पारडी फेडली जातात...कोकण असा प्रदेश जो निसर्गाने परिपूर्ण आहे...कोकणातल्या निसर्गाचा हेवा तर प्रत्येकाला आहे...दऱ्या खोऱ्या नद्या आणि अथांग समुद्र सोबतच हिरवा निसर्ग म्हणजे कोकण...पण निसर्गाचा वारसा लाभलेल्या या कोकणाला कोणाची तरी नजर लागली..शुद्ध हवा आणि निसर्गाचा आनंद लुटायला येणाऱ्या पर्यटकांची पावलं हळू हळू कमी झाली...कोकणाच्या वैभशाली निससर्गाचं कौतुक संपूर्ण जगप्रसिद्ध आहे...750 किलोमीटर पसरलेली अथांग समुद्र किनारपट्टी आणि सोबतीला दऱ्या खोऱ्या...घाटमाथ्यावरून वाहणाऱ्या नद्यांचा उगम आणि सोबतच खळखळ वाहणारे धबधबे ही कोकणची शान...

पण या कोकणाच्या निसर्गाला जखडलंय ते MIDC च्या केमिकल युक्त सांडपाण्याने...नद्या वाहतात खऱ्या पण त्यातून विसर्ग होतो तो रसायन मिश्रित पाण्याचा..ज्यांचा उदरनिर्वाह संपूर्ण मासेमारीवर आहे त्यांच्यासाठी आता धोक्याची घंटा वाजतेय आणि येणाऱ्या काळात पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली मासेमारी आता नष्ट होणार का असा प्रश्न निर्माण झालाय..कोकणचा निसर्ग हा दाट धुक्याने चांगलाच बहरून येतो आता धुकं कमी पण रासायनिक कंपन्यांच्या धुराचं साम्राज्य पसरलं आणि सुरवात झाली ती निसर्गाला गिळंकृत करण्याची...

कोकणचा उदरनिर्वाह हा संपूर्ण शेती व्यवसायावर आहे परंतु याच शेतीला शाप लागलाय तो MIDC च्या प्रदूषणामुळे... दुशीत पाण्यामुळे पीक घेणारी शेतं आता ओसाड झालीत...यामुळे असंख जनावरांना देखील त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय...कित्येकदा या केमिकलयुक्त पाणी पिऊन अनेक जनावरांचा जीव देखील गेलाय...एकीकडे या MIDC कडे रोजगाराची संधी म्हणून पाहिलं जातं पण या MIDC मुळे निसर्गाचा ऱ्हास होतोय हे कोणाच्या लक्ष्यात येतंय का हा प्रश्न सध्या निर्माण झालाय...

कोकणच्या या वैभशाली निसर्गाने इथल्या लोकांना खूप काही दिलं, या MIDC मुळे निसर्गाचा ठेवा मात्र या कोकणी जनतेच्या हातून हिसकावून घेतलाय...फिरून फिरून एकच प्रश्न मनात येतो तो म्हणजे ,पुन्हा बहरेल का हा कोकण माझा?

Comments

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....