जोडीदार...

सध्या मी खूपच गुंतत चाललोय, आणि झालेल्या गुंत्यामुळे काही जोडलेली नाती ही दुरावत चालली आहेत....माझ्या असण्या नसण्याने त्यांना फरक पडतो की नाही माहीत नाही पण मला त्या गोष्टीचा फरक पडतो फक्त फरक एवढाच की मी व्यक्त नाही होऊ शकत...

सध्या मला नवा जोडीदार सापडलाय,माझा एकांत मला पुन्हा सापडलाय...कुणासाठी न थांबता माझा प्रवास पुन्हा सुरू केलंय...अलगद वाहणाऱ्या आश्रूना आता काही काळ थांबा दिलाय...इतकी वर्ष नाती जपत होतो पण स्वतःचं मन कधी जपता आलं नाही...पण आता नाही आता स्वतःसाठी जगायला पाहिजे हे ध्यानात आलं....मग काय सुरू केला एकट्याचा प्रवास....झालेली घुसमट विसरून पुन्हा दीर्घ श्वास घेतला आणि वाटेला लागलो....

एकटं राहताना अडचण येतेय खरी,पण सवय झाली की होईल सगळं नीट....इतरांची मनिसिक्ता लक्ष्यात घेण्याआधी स्वतःच्या मनाची तयारी केलेली केव्हाही बरी....आपल्यामुळे अनेकांना त्रास झालाय याची जाणीव आहेच पण हा सारखा सारखा होणारा त्रास कुठे तरी थांबवा ,म्हणून मी शोधलेला हा माझा एकांत आज सोबती ठरला....

Comments

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....