नातं


इतकी वर्षे सोबत होतो
एकत्र कधी बसलोच नाही
एकाच वर्गात असून एकमेकांशी कधी बोललोच नाही

हरवला तो आमच्यातला जिव्हाळ्याचा संवाद
हरवला तो आमच्यातला जिवाहळ्याचा संवाद
एकमेकांना दोष देऊन
नित्य आमच्यात चाली वादविवाद

धाव धाव धावत होता
दिशा मात्र मिळतच नव्हती
विपरीत दिशेच्या मार्गावर दिशाभूल होत होती
त्यातच आमचे हृदय एकमेकांच्या हृदयाशी जुळत नव्हती

संपत चालला होता आमच्या नात्यातला जिव्हाळा
त्याच बरोबर संपून गेला आमच्या नात्यातला एकमेकां विषयी असणारा लळा

इतकं जगुन झालं
एकमेकांना बोलायला वेळच नाही
जगत आहोत कश्यासाठी
याचा मात्र तालमेळच नाही

एक क्षण असा येईल
घेऊन जाईल हा श्वास
अर्ध्यावरच थांबलेला असेल
आमच्या नात्यातला अविस्मरणीय प्रवास

वाटत होतं अजूनही वेळ आहे
एकमेकांशी बोलून गैरसमज दूर करून घेऊ
सुंदर अश्या नात्याला पुन्हा एकदा डोळे भरून बघून घेऊ
                          

Comments

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....