त्या पलीकडे
आजच्या रात्रीच्या पलीकडे
उद्याची सकाळ आहे
दुःख तर आहेच
त्याच्या पलीकडे सुख देखील आहे
नाती तुटताना पाहिली आहेत
त्या पलीकडे पण जाऊन पहायला हवं
नाती जुळताना देखील पाहिलं आहे
डोळ्यात भावना आहेत
पोटात मात्र भूक आहे
विसर पडतो या सर्वांचा
जेव्हा डोक्यावर छत्र आहे
विचारून बघा त्यांना
ज्यांचं छत्र आभाळ आहे
Comments