साहेब दिवाळी ......

मी आणि माझा मित्र रोमांच बऱ्याच वर्षांनी भेटलो...योगायोग म्हणजे आम्ही दोघं मुंबईतच होतो...व्हाट्स अप वर त्याचा स्टेटस पहिला म्हणून त्याला मी मेसेज केला आणि आम्ही भेटायचं ठरवलं....रुईया कॉलेज च्या कट्ट्यावर भेट झाली आणि गप्पा मारत आम्ही जवळच्या गार्डन मध्ये जाऊन आमच्या गप्पा रंगू लागल्या....विशेष म्हणजे आम्ही रंगभूमीवर काम केलेले कलाकार त्यामुळे आमच्या गप्पांना चांगलाच उधाण आलं... अनेक किस्से ,गमती-जमती, सगळ्या आठवणी आठवून आठवून मनसोक्त हसत होतो...तेवढ्यात एक watchman काका आमच्या इथे आले आणि म्हणाले, "साहेब दिवाळी"
मी जरा अवाक झालो कारण दिवाळी तर झाली मग आत्ता कसली दिवाळी..तेवढ्यात मी रोमांच कडे पाहिलं आणि रोमांच त्या काकांना म्हणाला की काका सध्या आम्हीच कठीण काळातून जातोय ओ आम्ही कुठून देऊ...तेवढ्यात watchman काका म्हणाले "साहेब जास्त काही नको मला फक्त 20 रुपये द्या चहा प्यायची आहे"... मी पुन्हा त्या watchman काकांकडे पाहिलं त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा तो निरागस आणि प्रामाणिकपणा पाहून जरा मलाच विचित्र वाटलं कारण गेले 8 महिने ज्यांचं हातावर पोट चालतंय त्या साऱ्यांची गोची झाली आणि संपूर्ण विस्कळीत होऊन बसलं. Watchman काकांकडे पाहून रोमांच देखील अचंबित झाला आणि रोमांच ने विचार न करता खिशातून 20 रुपये दिले.... पुन्हा आम्ही आमच्या गप्पा सुरू केल्या...तेवढ्यात ते watchman काका हातात चहा घेऊन आले ...त्या काकांकडे पाहून मी रोमांच ला सहज म्हणालो "यार रोम्या दिवाळी सगळ्यांचीच सारखी नसते ना रे"..."त्यांच्या आयुष्यात एखादा सुखाचा क्षण आला की तोच क्षण त्यांच्यासाठी खरी दिवाळी असते नाही का?.....रोमांच हसला आणि मला म्हणाला "एक आनंद नक्की वाटतो की कोणाच्या तरी आनंदात सहभागी होण्याची संधी तरी मिळाली, संधी म्हणण्यापेक्षा त्यांच्या आनंदाचा भाग होता आलं हे महत्त्वाचं" ...एवढं बोलून झालं आणि आम्ही पुन्हा आमच्या गप्पा सुरु केल्या ...गप्पा मारत होतो तेवढ्यात ते watchman काका आमच्या जवळ आले आणि म्हणाले "साहेब हा घ्या चहा"....मी आणि रोमांच क्षणभरासाठी आ वासून त्या काकांकडे पाहत बसलो...आम्ही काही न म्हणता तो चहा घेतला...रोमांच ला सहज म्हणालो "रोम्या यार आपण त्या काकांना दिवाळी दिली पण त्या काकांनी आपला देखील विचार केला त्यांनी स्वतःसाठी नाही आपल्यासाठी देखील चहा आणला"....खरच परिस्थिती कशी का असेना पण माणुसकीचं उत्तम उदाहरण त्यावेळी त्या watchman काकांना पहिल्या नंतर समजलं...खरच गेले 8 महिने lockdown होतं सर्व काही ठप्प असताना त्यांची परिस्थिती काय असेल याचा विचार न केलेलच बरं..कारण वयाच्या 65व्या वर्षी जो व्यक्ती watchman म्हणून काम करून कुटुंबाच्या पोटाचा विचार करतोय यावरूनच समजून जा की त्यांची परिस्थिती काय असेल...चहा देऊन काका परत निघाले तेव्हा त्यांच्या पाठमोऱ्या देहाकडे पाहून मनाला सांगितलं तो बघ जगातला सर्वात श्रीमंत माणूस जातोय....😊
*प्रभाकर वावेेेकर* काका विशेष आभार एक कटिंग साठी

Comments

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....