मोकळा श्वास

नाही खरच वाटत असतं नेहमी की कधी मोकळा श्वास घेतोय ते...हल्ली विचारांच्या विळख्यातून मोकळा श्वास घेणं अवघड होऊन बसलंय नाही का? एखाद्या व्यक्तीत किंवा एखाद्या गोष्टीत जीव गुंतत जातो त्यावेळी हृदयाचे स्पंदनं आणखीनच वाढत असतात...एखाद्यावर आपण पूर्णपणे अवलंबून असतो त्यावेळी अनेक गोष्टी घडतात  मुळात ज्याने आपण एकटावले जातो...
  अनेकदा आपण दुसऱ्यावर विसंबून असतो त्यावेळी त्याच्या मनात काय चाललंय हे आपण विचारत घेतच नाही...माझ्या बाबतीत नेहमी हेच घडत असतं... मी बऱ्याचदा दुसऱ्यावर विसंबून राहतो...कारण विश्वास....माझी सवय झाली आहे लगेच विश्वास ठेवायचं आणि मोकळं व्हायचं कधी त्या गोष्टीचा विचार नाही करत मी...एक घाणेरडी सवय मात्र मला लागली आहे गृहीत धरण्याची ...समोरची व्यक्ती देखील माझ्यासारखा विचार करत असेल का हा विचार मी करतच नाही...लगेच गृहीत धरून मोकळा होतो...का असं होतं याचा काहीच सुगावा लागत नाही...नंतर मात्र या गोष्टीचा त्रास तेवढा होतो....
   गृहीत धरून चालायची सवयच झाली आहे मला...समोरच्याच्या मनातलं न जाणता मी त्या व्यक्तीला गृहीत धरून मोकळा होतो....निदान त्याचं माझ्याबद्दल मत काय आहे हे जाणून तर घ्यायला हवं ना...जर तसं मला जमलं तर नक्कीच मी समोरच्याच्या मनात माझं स्थान पक्कं करू शकेन....आणि या सर्व गोष्टीमुळे मी नक्कीच मोकळा श्वास घेईन

Comments

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....