सोडा ना कुणास काय फरक...
निजलो शांत जरी सरणावरती
उराशी कवटाळले त्या ज्वालानी
व्यक्त व्हायचे गेले राहुनी...
सोडा ना कुणास काय फरक
झिजून गेली जिंदगी सारी...
काढली काळाने पारध अशी
जणू चोर पोलिसांचीच कहाणी...
सोडा ना कुणास काय फरक...
अंतयात्रेत जमला गोतावळा जसा
सर्वत्र पसरला पसारा जसा..
सोडा ना कुणास काय फरक..
डोळ्यात दाटले अश्रू सर्वांच्या
वाटते जणू उरलेली ती फक्त औपचारिकता
सोडा ना कुणास काय फरक...
कुठलं स्वर्ग आणि कुठलं नरक
अस्तित्व टिकलं तर बरं,
Comments