चाय वाली लव्हस्टोरी...

तिची आणि माझी फारशी ओळख नव्हती,
कधीतरी मित्रांसोबत जायचो.
बऱ्याचदा तिला भेटण्यासाठी मी टाळाटाळ करायचो... 

एकदा एकतांत तिची आणि माझी भेट झाली...
तिच्या सहवासात राहून मन मोकळं केलं,आणि तेव्हापासून मला तिच्या सहवासाची सवयच झाली... 

आता एक दिवस असा नाही की मी तिला भेटलो नाही ...
कारण तिच्याशिवाय आता मला करमतही नाही... 

दिवस मावळतीला गेला की ओढ लागायची दुसऱ्या दिवसाची , 
कारण कधी कुठे केव्हाही भेट आमची व्हायची

तिला भेटण्यासाठी मी कारणांची पुरवणी लावायचो,
अनेकदा तर बॉस च्या शिव्या देखील खायचो,
कित्येकदा तर आधी तिची भेट आणि मगच ऑफिस ला जायचो... 

पण या लॉकडाउन मुळे आमचं भेटणं रखडलं,
कोणी कुठे वटवाघूळ खाल्लं
आमच्या भेटीत विघ्न म्हणून लॉकडाउन आडवं आलं...

रोज तिला भेटण्यासाठी मी बाहेर पडतो,
बॅरिगेट्स पाहून मी पुन्हा ऑफिसचीच वाट धरतो... 

माझी लव्हस्टोरी सांगण्याच्या नादात तिची ओळख सांगायचं राहून गेलं...
चहा तिचं नाव हे सांगायचंच राहून गेलं..

Comments

Unknown said…
Bahot khub.
Unknown said…
Khup chaan 👌👌☕👌👌
Unknown said…
मेरी तो बस एक ही राय है. दुनिया मै सब से खुबसूरत चाय है.☕
Gabru said…
Wah wah chai is true love ❤
तुला तर तुझ्या चाय ने वेड लावलं पण मला मात्र तुझ्या शब्दांनी मंत्रमुग्ध करून टाकल... माझ्या लाडक्या भावाची लेखणी अशीच गगनाला भिडुदे..
Unknown said…
भारी एकदम ❤️
aditya said…
bhava man jinklas😍
Unknown said…
Khup chhan dada
#Tea_lover💚
Unknown said…
Chaan ahe love story......tea Lover ��
Anonymous said…
Super
Anonymous said…
खूप मस्त ☕👌👌😊
Jyoti said…
Khup Chan #chailover

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....