जायचं कुठे होतं,आणि जातोय कुठे?

जायचं कुठे होतं,
आणि जातोय कुठे?

इतरांना वाचण्यात गुंग होतो,
स्वतःलाच वाचायला वेळ मिळतोय कुठे?

कारण जायचं कुठे होतं,
आणि जातोय कुठे?

नाराज तर सर्वांसोबत आहेच मी,
पण नाराजी व्यक्त करतोय कुठे?

कारण जायचं कुठे होतं,
आणि जातोय कुठे?

काही गमावलेच नाही आयुष्यात,
कारण गमवयला कमावलच कुठे?

कारण जायचं कुठे होतं,
आणि जातोय कुठे?

हसणाऱ्या देहाला कसली दुखांची फिकीर,
दुःख व्यक्त करायला माणुसकीच उरलि कुठे?

कारण जायचं कुठे होतं,
आणि जातोय कुठे?

_प्रथमेश महाडिक

Comments

Unknown said…
Nehami Sarkhach Sundaar😍
Sayali said…
Deep💯❤️

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....