पाऊस आणि...

आज ती पहिल्यांदा पावसात भिजताना दिसली…
क्षणभर वाटलं, हा पाऊसच तिच्यासाठीच पडतोय की काय.
चिंब भिजलेली ती…
साडीचा पदर हलकेच सावरताना, तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच लय होती.
जणू पावसाचे थेंब तिच्या भोवती नाचत होते, आणि ती त्या सगळ्याची राणीच होती.
पावसाचा प्रत्येक थेंब तिच्या अंगावर अलगद पडत होता…
पण थंडी मात्र माझ्या अंगावर काटा आणत होती.
कारण ते थेंब तिच्या जवळ होते… आणि मी मात्र दूर उभा, फक्त बघत होतो.
तिच्या केसातून ओघळणारे पाण्याचे थेंब…
गालावरून हळूच घसरत होते…
आणि त्या प्रत्येक थेंबात मला माझंच प्रतिबिंब दिसत होतं.
ती पदर सावरत होती,
आणि मी माझ्या मनाला…
कारण मनाला तर तिच्या त्या रूपावर प्रेमच बसलं होतं.
पावसात भिजलेली ती फक्त सुंदर नव्हती,
ती एक भावना होती…
एक अशी जादू, जी शब्दांत मावणार नाही.
आज समजलं…
पाऊस फक्त आकाशातून पडत नाही,
तो मनातही पडतो…
आणि जेव्हा पडतो, तेव्हा आठवणींचा सुगंध कायमचा सोडून जातो.
ती पावसात भिजत होती…
आणि मी तिच्या प्रेमात.

Comments

Anonymous said…
Ti chorun hi tulach pahat hote ya rimzimnarya pavsat....☔🌧️🌩️🫂👩‍❤️‍👨

Popular posts from this blog

तीन चाकांची कहाणी...

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

"आख़िर हम कहानी बन जाते हैं..."