पाझर...
कधी कधी जखमा दिसत नाहीत… पण त्या सतत झिरपत राहतात.
जणू काही मनाच्या भिंतीतून “पाझर” फुटलेला असतो…
आईच्या जुन्या साडीत अजूनही तिचा वास आहे…
त्या कपाटात हात घातला की आठवणींचा पाझर आपोआप डोळ्यात येतो.
ती साडी काढताना वाटतं, जणू आई म्हणतेय –
"काय रे, एवढा मोठा झालास… पण अजूनही रडतोस का?"
आणि तेव्हा कळतं…
मोठं होणं म्हणजे रडणं थांबवणं नाही…
तर रडणं लपवणं आहे.
बाबांच्या खिशात कधीच पैसे नसत…
पण माझ्यासाठी त्यांनी कधी “नाही” म्हटलं नाही.
आज माझ्या खिशात पैसे आहेत…
पण बाबांचा हात धरायला ते नाहीत…
हीच तर ती पाझरलेली वेदना आहे…
जिला शब्द नसतात… पण डोळे सगळं सांगतात.
एक मित्र होता…
ज्याच्यासोबत सगळं शेअर करायचो…
आज तो online असतो, पण आपल्यासाठी offline…
त्याच्या “last seen” मध्येच आपल्या नात्याचा शेवट दिसतो…
त्या चॅटमध्ये अजूनही “typing…” ची वाट पाहताना,
मनाच्या आत कुठेतरी एक पाझर फुटतो…
आणि ती…
जिच्यासोबत आयुष्याचं स्वप्न रंगवलं होतं…
ती आज कुणाच्या तरी नावाने हसतेय…
आणि आपण…
तिच्या आठवणींना धरून अजूनही जगतोय…
किती विचित्र आहे ना…
तिच्या एका “Goodbye” ने
आपल्या आयुष्याचा “Pause” बटन दाबला…
पाझर म्हणजे काय असतं माहितीये?
तो फक्त पाणी नसतो…
तो असतो –
अपूर्ण स्वप्नांचा ओघ,
न सांगितलेल्या भावना,
आणि न मिटलेल्या जखमांचा शांत आवाज…
रडणं कधीच कमकुवतपणाचं चिन्ह नसतं…
ते असतं –
तुम्ही अजूनही जिवंत आहात याचं पुरावा…
म्हणून…
कधी वाटलं तर रडा…
त्या पाझराला वाहू द्या…
कारण काही वेदना थांबवल्या तर…
त्या आतून आपल्याला तोडतात…
शेवटी एकच…
पाझर थांबत नाही…
तो फक्त आपल्याला मजबूत बनवत जातो…
पण प्रत्येक थेंबात…
एक कथा असते…
आणि प्रत्येक कथेत…
एक न सांगितलेलं “दुःख”…
Comments