तिचा तो एक मेसेज...

"एका ‘Hi’ पासून सुरू झालेलं आयुष्य..."
कधी कधी आयुष्य खूप साध्या गोष्टींनी बदलतं…
ना कुठला मोठा प्लॅन, ना कुठली तयारी…
फक्त एक छोटंसं "Hi"… आणि सगळं काही बदलून जातं.
आम्ही दोघं… अगदी अनोळखी.
नाव माहिती नव्हतं, चेहरा माहिती नव्हता…

फक्त एक "Hi छान लिहितोस तू ब्लॉग्स मस्त असतात"… 
तेव्हाच कळलं नव्हतं… की हा Hi एक दिवस आयुष्याचा आधार बनेल.
मला लिहायची प्रचंड आवड…
शब्द माझं जग होतं, भावना माझं घर.
पण त्या शब्दांना अर्थ द्यायला कोणीतरी हवं होतं…
आणि ती आली…
एक वाचक म्हणून.
ती माझे ब्लॉग वाचायची…
आणि प्रत्येक वेळी काहीतरी असं लिहायची,
ज्यामुळे मला वाटायचं—
"कोणीतरी आहे… जो मला समजून घेतोय."
हळूहळू माझं लिखाण बदलायला लागलं…
शब्द अधिक खोल झाले…
कारण ते फक्त कागदावर उतरलेले नव्हते,
ते तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत होते.
दिवस सरत गेले…
आणि आमचं बोलणंही बदलत गेलं…
"Hi" वरून "Good Morning"…
"Take Care" वरून "Good Night Babe" पर्यंत.
पण हे सगळं इतकं सहज घडलं…
की कधी तिचं अस्तित्व माझ्या आयुष्याचा भाग बनलं,
हे मला कळलंच नाही.
आता ती फक्त वाचक राहिली नव्हती…
ती माझ्या प्रत्येक शब्दामागची भावना बनली होती…
माझ्या प्रत्येक ओळीचं कारण…
आणि माझ्या प्रत्येक शांततेचं उत्तर.
कधी कधी मी विचार करतो…
जर त्या दिवशी मी reply  केला नसता,
तर…?
कदाचित आजही मी लिहित असतो…
पण त्या शब्दांमध्ये जीव नसता.
आता प्रत्येक सकाळ तिच्या "Good Morning" ने सुरू होते…
आणि प्रत्येक रात्र तिच्या "Good Night" ने पूर्ण होते.
माझं जग… तिच्या एका मेसेजवर अवलंबून झालंय.
पण प्रेम म्हणजे फक्त गोड शब्द नाहीत…
ते एक वचन असतं—
सगळ्या अडचणींना एकत्र सामोरं जाण्याचं.
मला माहित आहे…
आयुष्य सोपं नाही…
उद्या कदाचित खूप कठीण दिवस येतील…
पण एक गोष्ट नक्की आहे—
"ती माझ्यासोबत असेल, तर काहीच अशक्य नाही."
मला तिच्यासोबत फक्त हसणं नाही…
तर रडणंही वाटून घ्यायचं आहे.
प्रत्येक संघर्षात तिचा हात हातात घेऊन उभं राहायचं आहे.
आणि शेवटी…
मला तिच्यासाठी काही मोठं करायचं नाही…
ना तिला जग दाखवायचं आहे…
मला फक्त तिला कायम खुश पाहायचं आहे.
कारण…
त्या एका "मेसेज" ने मला प्रेम दिलं…
आणि आता…
त्या प्रेमासाठी मी पूर्ण आयुष्य द्यायला तयार आहे.

Comments

Popular posts from this blog

तीन चाकांची कहाणी...

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

"आख़िर हम कहानी बन जाते हैं..."