पैंजण

एवढंसं दागिनं, पण मनाला वेड लावणारं.
तिच्या पावलांमध्ये गुंफलेलं, आणि माझ्या हृदयात कायमचं वाजणारं.
ती चालत असते… शांतपणे, काही न बोलता.
पण तिच्या पैंजणांचा नाद मात्र खूप काही सांगून जातो.
तो नाद म्हणजे जणू तिचं हसू, तिची लाज, तिची चाहूल…
आणि माझ्यासाठी — तिच्या येण्याची गोड सूचना.
पहिल्यांदा ऐकला होता तो आवाज…
कानांनी नाही, तर मनाने.
ती जवळ आली की आधी पैंजण बोलायचे,
आणि मग तिची नजर माझ्याशी भिडायची.
कधी कधी वाटतं,
तिने काही बोलू नयेच…
फक्त तिच्या पैंजणांचा आवाज यावा,
आणि मी त्या नादात हरवून जावं.
पावसात ओल्या रस्त्यावर चालताना,
तिच्या पैंजणांमधून उमटणारा प्रत्येक सूर
माझ्या मनात एक वेगळीच कविता लिहून जातो.
तिच्या प्रत्येक पावलागणिक,
तो नाद माझ्या हृदयावर ठसा उमटवत जातो…
जणू ती म्हणतेय —
"मी आहे तुझ्यासोबत… प्रत्येक क्षणी."
पैंजण म्हणजे फक्त चांदीचे घुंगरू नाहीत,
ते तिच्या अस्तित्वाचा आवाज आहे.
आणि त्या आवाजातच माझं प्रेम हरवलंय…
कारण,
ती दिसली नाही तरी चालेल…
पण तिच्या पैंजणांचा नाद…
तो मात्र आयुष्यभर ऐकत राहावा असाच आहे…

Comments

Anonymous said…
❤️🤌🏻✨😘Khup Khup Goad❣️
Anonymous said…
❤️👌

Popular posts from this blog

तीन चाकांची कहाणी...

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

"आख़िर हम कहानी बन जाते हैं..."