Posts

असावं कुणीतरी....

सहज तिने विचारलं काय रे एकटाच का बसला आहेस??? मी म्हणालो....., असावं कुणीतरी...आपल्याला समजून घेणारं.. असावं कोणीतरी... आपण चुकल्यावर आपल्याला समजावून सांगणारं असावं कोणीतरी... आपण अडखळल्यावर आपल्याला सावरणारं असावं कोणीतरी... आपल्याला आपलसं वाटणारं.... त्यावर ती म्हणते कशी... आहे ना मी का तू एकटा बसतोयस? मी असताना सुद्धा एकटा का सोसतोयस? सांगितलं होता तुला कधी ही आवाज दे मला बोल ना तू माझ्याशी, कशाला शोधतोयस ह्याला त्याला.... मी दुख:त असले कि चेहरा तुझा पडतो तुझा त्रासलेला आवाज मलासुद्धा कळतो...

ती आणि....

Image
तिचं माझ्याशी रोज बोलणं...काही दिवस मात्र आम्ही दोघं ही गप्पच होतो...कारण माहित नाही...कदाचित ती तिच्या कामात आणि मी माझ्या कामात व्यस्त होतो...सहज आज बोलणं झालं, एका meme वरून आमचा संवाद सुरू झाला...माझं मध्येच तिच्याशी न बोलणं तिला खटकत असायचं...कारण रोजची सवय अचानक तुटावी आणि संपूर्ण रंगलेली मैत्री क्षणात विस्कटावी...आमची मैत्री इतकी घट्ट की माझ्या चुकांवरून पांघरून घालून माझी समजूत घालून तिनेच मला मिठी मारावी... तिला माझ्याकडून कसली ही अपेक्षा नाही,तिला फक्त गरज आहे ती माझ्या सहवासाची,आपुलकीची आणि प्रेमाच्या चार शब्दांची...नशीब लागतं अशी मैत्रीण मिळायला जिच्या सहवासात संपूर्ण आयुष्य मिळतंय जगायला.... चेहऱ्याच्या हाव भावतून मनातले भाव ओळखून "काय झालं सगळं ठीक आहे ना?" असं हक्काने विचारणारी ती...आज मात्र तिच्या मनातले भाव न ओळखू पाहणारा मी...तिच्या ही मनाला वाटत असेल कुठे तरी आपल्या मनातलं कोणीतरी ओळखावं कधीतरी....नकळत येणाऱ्या अश्रूंना रोखून धरावे कुणीतरी....तिला ही वाटतं मिश्किल हसणं पुन्हा खुलू दे तिच्या गालावरी...तीच जाणते जखमा झालेल्या तिच्या हृदयावरी.... कर्तव्याची ओझ

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

Image
श्रीमान योगी.... नावातच आदर दिसतो...आणि आदर का नसावा...श्रीमान योगी -  आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण . पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते तो महापुरुष म्हणजे स्वराज्य जनक छत्रपती शिवाजी महाराज... सध्याची पिढी मोबाईल मध्ये गुंतली आहे...मी पण असाच मोबाईल मध्ये गुंतून असतो...सहजच घरातल्या एका ड्रॉवर मध्ये मला हे पुस्तक दिसलं, बरेच दिवस वाचायची इच्छा होती पण या मोबाईलच्या जाळ्यातून वेळ कुठे मिळतो...आज मात्र वेळ काढलाच आणि श्रीमान योगी हाती घेतलं...पहिलीच ओळ नजरेस पडली.... निश्र्चयाचा महामेरू| बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचे रूप आपल्याला थक्क व्हायला लावते, इतका अष्टपैलू, अष्टावधानी,आदर्श राज्यकर्ता थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी,परमधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टी असणारा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे अशक्य आहे.

जोडीदार...

सध्या मी खूपच गुंतत चाललोय, आणि झालेल्या गुंत्यामुळे काही जोडलेली नाती ही दुरावत चालली आहेत....माझ्या असण्या नसण्याने त्यांना फरक पडतो की नाही माहीत नाही पण मला त्या गोष्टीचा फरक पडतो फक्त फरक एवढाच की मी व्यक्त नाही होऊ शकत... सध्या मला नवा जोडीदार सापडलाय,माझा एकांत मला पुन्हा सापडलाय...कुणासाठी न थांबता माझा प्रवास पुन्हा सुरू केलंय...अलगद वाहणाऱ्या आश्रूना आता काही काळ थांबा दिलाय...इतकी वर्ष नाती जपत होतो पण स्वतःचं मन कधी जपता आलं नाही...पण आता नाही आता स्वतःसाठी जगायला पाहिजे हे ध्यानात आलं....मग काय सुरू केला एकट्याचा प्रवास....झालेली घुसमट विसरून पुन्हा दीर्घ श्वास घेतला आणि वाटेला लागलो.... एकटं राहताना अडचण येतेय खरी,पण सवय झाली की होईल सगळं नीट....इतरांची मनिसिक्ता लक्ष्यात घेण्याआधी स्वतःच्या मनाची तयारी केलेली केव्हाही बरी....आपल्यामुळे अनेकांना त्रास झालाय याची जाणीव आहेच पण हा सारखा सारखा होणारा त्रास कुठे तरी थांबवा ,म्हणून मी शोधलेला हा माझा एकांत आज सोबती ठरला....

भेट.....

Image
नशिबात काय वाढलेलं असतं हे कोणालाच ठाऊक नसतं...कधी कसं केव्हा कुठे कोणाची भेट होईल हे ही सांगता येत नाही... असच काहीसं माझ्या आणि तिच्या बाबतीत घडलं असावं....2 वर्षांपूर्वी आमची शेवटची भेट झाली वाटलं नव्हतं की पुन्हा आम्ही कधी भेटू...कारण माझ्या एका चुकीमुळे आम्ही दोघं पण लांब गेलो...यात तिची काही चूक नव्हती... म्हंटले आता पुन्हा आमची भेट होणे नाही.... 2 दिवसांपूर्वी अचानक तिचा फोन आला,मी जरा विचारात पडलो की आज कसा काय हीचा फोन आला....आणि 2 वर्षांपूर्वी संपलेला संवाद पुन्हा सुरू झाला...तिचा आवाज ऐकताच जरा हिरमुसून गेलो कशासाठी फोन केला हे कळण्याआधीच मनात विचार आला की लग्नाचं आमंत्रण तर नसेल ना मी काही बोलण्याआधी समोरून तिनेच विचारलं कुठे आहेस मी शांतपणे म्हंटले गावी आहे...मी गावी आहे ऐकताच ती तारकर्ली मध्ये आहे असं सांगितलं मी विचार न करता भेटुयात असं म्हटलं खरतर माझ्या गावापासून तारकर्ली 270 किलोमीटर वर आहे...कसला ही विचार न करता मी थेट तिला भेटायला गेलो.... साडे चार तासांच्या प्रवासात तिचेच विचार मनात येत होते... म्हंटले भेटून सगळं तिला सांगावं....पण तिची भेट झाल्यानंतर स

जातकारण....

सर्वप्रथम माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी काही ही संबधंध नाही..... काल पासून एक भाषण जोरदार गाजतय...टीका टिप्पणी ही सुरू झालीय...राजकीय वर्तुळातही त्याचा प्रभाव पाहायला मिळतोय...अनेक पक्ष स्वार्थासाठी एक होतात आणि त्या स्वार्थापोटी चिरडला जातोय तो सामान्य माणूस.... जातीयवाद कधी संपेल असं वाटत नाही कारण जो पर्यंत आपण रंगावरून धर्म शोधत बसू तोपर्यंत हे वाद असेच सुरू राहणार आहेत...प्रत्येकाने एकच विचार करायला हवा की आपला देश हाच आपला धर्म आहे "भारतीय"...गर्वाने सांगतो की अभिमान आहे भारतीय असल्याचा....मग हा अभिमान निवडणुकीच्या वेळी कुठे जातो...? मत मागायला हात पसरता मग जेव्हा मदत लागते तेव्हा पाठ का दाखवता? कुठल्याही धर्मावर बोलण्याचा अधिकार आपल्यातल्या कोणालाच नाही आहे...आणि हा निर्बंध संविधानाने आपल्याला घातलाय...काही विकृतांचा निषेध आपण सगळेच करतो परंतु त्यात इतर सामन्यांची काय चूक आहे...एका व्यक्तीमुळे आपण सर्वांना दोषी ठरवतो हे योग्य आहे का? परप्रांतीय आपल्या राज्यात येतात याचा राग द्वेष संताप दाखवता,अरे ते लोक आपल्या राज्यात येऊन धंदा करू शकतात मग आपण का नाही करू शकत याची लाज

'इतिहास' इतिहास जमा....?

इ.स 6 जून १६७४ रोजी   स्वराज्याची स्थापना झाली...मुघलांच्या दडपशाही विरोधात अनेकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला... वेदशी व्यापारी भारतात येऊन व्यापार करण्याच्या हेतूने आले.परंतु त्यांचा हेतू व्यापार करण्याचा नव्हताच कधी...हेतू होता तो फक्त राज्य करण्याचा....अफगाणी, पोर्तुगीज, मुघल सलतनत सर्वांची भारतावर नजर होती... 17 व 18 वे शतक म्हणजे महाराष्ट्रातील योद्यांच्या पराक्रमाची गाथा म्हटली जाते.नरवीर तानाजी मालुसरे,कोंडाजी फर्जंद,रायाजी बांदल,बहिर्जी नाईक,बाजीप्रभू देशपांडे,फुलाजीप्रभू देशपांडे,जीवा महाला,शिवा काशिद असे कित्येक अगणीक सूर्य या मराठी मातीत सूर्योदयाला आले...प्रत्येकाचा एकच ध्यास ' स्वराज्य '... प्रत्येक जण झटला तो मराठी अस्मिता जागी आणि जिवंत ठेवण्यासाठी.... आऊ जिजाऊंच्या स्वप्नाला खरं ठरवण्यासाठी प्रत्येक मावळा आपल्या राजाच्या खांद्याला खांदा लावून तयारच होता... स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्याने त्याचा जीव राज्यांसाठी ओवाळून टाकला होता.... 19 फ्रेबुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज या क्रांतीसूर्याचा जन्म झाला. शिवबाच्या जन्माने साडेतीनशे वर्षांच्या काळ्या