सहा तासांचा सोबती...
एकदा मुंबईहून गावी येत होतो...गावी येण्याची ओढ ही मला लहानपणापासूनच होती...शिवशाही बस ने मी मुंबईहून निघालो,प्रवास माझा एकट्यालाच करायचा होता पण नशिबी एक साथीदार देऊन गेला...दादर ला माझं boarding झालं , मी मोबाइल काढला आणि गाणी ऐकत माझा प्रवास सुरु केला....प्रवासात मला गाणी ऐकण्याची सवयच आहे...माझ्या बाजूची सीट रिकामी होती आणि मला नव्हतं माहीत की ती रिसर्व्ह आहे ...म्हणून मी माझी बॅग बाजूच्या सीट वर ठेवली आणि डोळे मिटून गाणी ऐकत होतो...पनवेल आलं आणि मला एका आजींनी खुनावलं..मी ताडकन जागा झालो आणि काय झालं विचारलं ...तेवढ्यात त्या आजी स्मितहास्य करून म्हणल्या "बाबू ही सीट माझी आहे , बॅग उचलतोस का?" मी पण हसूनच उत्तर दिलं "अहो बसा ना तुमचीच आहे सीट"...साधारण पाहिलं तर त्या आजींचं वय 70 ते 75 असेल...मी पुन्हा गाणी ऐकण्यात गुंग झालो.... थोड्यावेळाने माझी नजर सहज त्या आजींकडे गेली त्या एकटक माझ्याकडे पाहत होत्या..."काय झालं आजी असं का पाहताय काही हवं का?" मी विचारलं..."काही नाही , तुला पाहून माझ्या नात्वाची आठवण आली,5 वर्ष झाली पाहिलं नाही त्...