Posts

सोडा ना कुणास काय फरक...

Image
निजलो शांत जरी सरणावरती उराशी कवटाळले त्या ज्वालानी  व्यक्त व्हायचे गेले राहुनी... सोडा ना कुणास काय फरक झिजून गेली जिंदगी सारी...  काढली काळाने पारध अशी जणू चोर पोलिसांचीच कहाणी... सोडा ना कुणास काय फरक... अंतयात्रेत जमला गोतावळा जसा  सर्वत्र पसरला पसारा जसा.. सोडा ना कुणास काय फरक.. डोळ्यात दाटले अश्रू सर्वांच्या वाटते जणू उरलेली ती फक्त औपचारिकता  सोडा ना कुणास काय फरक... कुठलं स्वर्ग आणि कुठलं नरक अस्तित्व टिकलं तर बरं,  नाहीतर कुणास काय फरक...

नवसंजीवनी...

Image
हनुमान  ऊर्फ  मारुती  ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. मारुतीच्या अनेक शौर्य गाथा अजूनही आजही अनेकांच्या मनात कोरल्या गेल्यात...ज्यावेळी रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि लंकेला घेऊन गेला त्यावेळेस सीतेला परत आणण्यासाठी वानरसेना सज्ज झाली..सीतेला परत आणण्यासाठी अनेक आव्हानं रामासमोर उभी ठाकलेली... सर्व आव्हानांना सामोरं जाण्यासाठी रामसोबत खंबीर पणे उभा होता तो हनुमान... ज्यावेळी रावण आणि राम यांच्यात युद्ध घडलं त्यावेळी लक्ष्मणाला बाण लागला आणि तो बेशुद्ध पडला , सर्व देव ऋषीमुनी एकजूट झाले परंतु कोणालाच लक्ष्मणाला शुद्धीवर आणता आलं नाही...सर्व देव तिथे उपस्थितीत असूनही एकाही देवाला लक्ष्मणाला शुद्धीवर आणणं जमलं नाही..तेव्हड्यात एक ऋषी उठले आणि त्यांनी उत्तरेच्या बाजूला द्रोणागिरी पर्वत आहे त्यावर मिळणारी संजीवनी हीच लक्ष्मणाला वाचवू शकते असं सांगितलं हनुमानाने कुठलाही विचार न करता लगेच उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्...

खेळ प्रश्न उत्तरांचा...

खेळ प्रश्न उत्तरांचा नाती गोती दूर लोटली गेली स्वार्थापायी आपलीच माणसं दूर गेली कधी आपलं,आपण ,आमचं म्हणणारे आज माझं म्हणायला लागले विसर पडला त्यांना जे अडचणीत त्यांच्या सोबत आले विसरून ते दिवस आपला स्वार्थ पाहू लागले काय सांगावं त्यांना जे माणुसकीच हरवून बसले  आदळणाऱ्या लाटांचा स्पर्श जेव्हा किनाऱ्याला होतो,त्या किनाऱ्याच्या वेदना पाहून समुद्र पण ओहटीची भूमिका घेतो  हल्ली माणसाला माणूस म्हणून कोण नाही पहात त्याची फक्त पाहिली जाते जात Sign of true love म्हणून ताजमहल ला पाहिलं जातं Sign of friendship म्हणून राधा कृष्णाचं नातं का लपवलं जातं?  समोरच्याच्या भावना आपण दुखवतो त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायला आपण कधी जातो? समोरच्याच्या चुकीवर आपण त्याला तत्वज्ञान शिकवतो आपली चूक आपण कधी मान्य करतो?  आपल्याला गरज असते तेव्हा समोरच्याला आपण मस्का मारतो समोरच्याला गरज भासते तेव्हा आपण त्याला फाट्यावर मारतो....

विठुराया रुसलास की काय???

प्रिय विठुराया, पत्रास कारण की ... विचारपूस करावी म्हटलं , काय रे विठुराया रुसलास कि काय , यांदा वारी चुकली म्हणून रागावलास कि काय...? नाही जमलं रे यंदा यायला तुझ्या दारी , कोरोना पायी बंद  झाली देवळं सारी...सावळं तुझं रूप पाहण्या थांबतो वर्षभर जरी, यंदा मात्र चुकली तुझी हि वारी...नामघोषात दुमदुमते तुझी पंढरी ,यंदा मात्र सुनी झाली तुझी हि नगरी...तुझा गजर थांबला,तुझ्या नामाचा टाळहि हुकला..अरे सावळ्या विठूराया यंदा वारीचा हा सारा खेळहि फसला...पिढ्यां- पिढ्याची परंपरा आज मात्र खुंटली, तुझी वारी चुकली हि गोष्ट आम्हला नाही पटली...जशी ओढ लेकराला त्याच्या माय बापाची तशी ओढ आम्हा वारकर्यांना तुझी... यंदाच्या वारीचा योग चुकला आणि हा वारकरी तुझा रस्ता मुकला...तूच बाप बंधू तूच सखा , जगाचा कैवारी तू युगे युगे विटेवर उभा...पंढरपूर हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यसमोर उभी राहते ती चंद्रभागा ,वाळवंटात जमलेलो आम्ही वारकरी , आठवते ती पायी निघालेली वारी... शेकडो वारकरयांचा प्रवास , प्रत्येकाच्या ओठी फक्त तुझं नाव...पंढरीच आहे आम्हा वारकऱ्यांचं गाव...एकदा का तुझी वारी सुरु झाली कि तुझा नाद घुमू लागतो , माउल...

हरवलेलं ते हास्य...

हरवलेली एखादी गोष्ट पटकन सापडते,पण हरवलेलं हास्य कधीच सापडत नाही...विचारून पाहावं कधी त्याला ज्याचं हास्य त्याच्यासाठी सर्व काही होतं... एखाद्याचं शांत बसणं आपल्याला परवडेल पण हास्याचे केलेलं सोंग कधीच नाही...स्वतःला प्रश्न विचारून पहा कधी,समोरची व्यक्ती खरच हस्तेय की देखावा करतेय...आयुष्य आपलं जोकर सारखं झालंय, स्वतः दुःखाच्या सागरात बुडून इतरांना हास्याच्या लाटांचा आनंद देतोय...खरच हसणं जेवढं सोप्प समजतो तेवढं सोप्प नाही आहे...डोळ्यात अश्रू दाटले असले तरी ते लपवता आले पाहिजेत,नाही का?

एक फोन कॉल...

   एक फोन कॉल आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरतो,कारण sms करणं त्यावर ईमोजी पाठवणं याने खरच भावना व्यक्त होतात का? भावना व्यक्त होण्यासाठी आपल्याला बोलावं लागतं... आपली जवळची व्यक्ती आपल्यावर कितीही रुसलेली असली तरी त्याच्याशी एकदा आपण फोन वर बोलून घ्या आणि जर ती आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ असेल तर तिच्याशी भेटून बोला...वाद कमी करण्याचं एकच मध्यम आहे ते म्हणजे संवाद..आपण हक्काने एखाद्यावर नाराज होतो मग त्याच हक्काने त्याला फोन करा आणि व्यक्त व्हा...मग बघा तुमच्या आणि त्याच्या नात्याला पुन्हा नवी पालवी फुटलेली असेल

जात

'जात' हा शब्द जरी ऐकलं ना तर तळपायाची आग मस्तकात जाते.हल्ली आडनाव पाहून माणसाची जात ओळखली जाते...त्यावरूनच त्यांचा धर्म ओळखला जातो...जरी आपण 21व्या शतकात असलो तरीही अजून आपण पुरोगामी विचारांनीच जखडलो गेलोय..माणूस नाही तर सध्या जात महत्वाची ठरते...अपडेटेड मोबाईल वापरतो कारण जुनं version outdated झालेलं असतं, मग नवीन विचार का आपण आमलात आणत नाही...  आडनाव फक्त एक ओळख करून देण्यासाठी आहे...तरी देखील लोकांची मानसिकता अजूनही पुरोगामी विचारात अडकली आहे...एकीकडे आपण सर्व धर्म समभाव मोठ्यापणाने सांगतो...पण वेळ जेव्हा आपल्यावर येते तेव्हा मात्र आपण शांत असतो...कोणाला दोष द्यायचा हेतू नाही माझा , पण पाहिलं तर बऱ्याच गोष्टी आहेत...जात गोत्र धर्म या सगळ्या गोष्टींनी आपल्याला जखडलंय...आता खरच वेळ आहे ती पुरोगामी विचारांच्या पलीकडे पाहण्याची...स्वतः पुढाकार घेऊन या सर्व गोष्टी विसरून एक जुटीने राहण्याची गरज सध्या भासतेय...मी तर जातीयवादाचा विरोधात आहे ,अन तुम्ही???