Posts

जायचं कुठे होतं,आणि जातोय कुठे?

Image
जायचं कुठे होतं, आणि जातोय कुठे? इतरांना वाचण्यात गुंग होतो, स्वतःलाच वाचायला वेळ मिळतोय कुठे? कारण जायचं कुठे होतं, आणि जातोय कुठे? नाराज तर सर्वांसोबत आहेच मी, पण नाराजी व्यक्त करतोय कुठे? कारण जायचं कुठे होतं, आणि जातोय कुठे? काही गमावलेच नाही आयुष्यात, कारण गमवयला कमावलच कुठे? कारण जायचं कुठे होतं, आणि जातोय कुठे? हसणाऱ्या देहाला कसली दुखांची फिकीर, दुःख व्यक्त करायला माणुसकीच उरलि कुठे? कारण जायचं कुठे होतं, आणि जातोय कुठे? _प्रथमेश महाडिक

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...

Image
वर्षाचा सण ह्यो कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा...जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेला चाकरमानी गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो...आपल्या लाडक्या बाप्पाला वर्षानी भेटायचा योग असतोच पण कुटुंब एकत्र येऊन सण साजरा होणार याचा आनंद जास्त असतो...गावखेड्यातला पोर शहरात गेलं मुंबई पुणे अहो एवढंच काय तर सातासमुद्रापलिकडे गेलं...तरी त्याला गावची ओढ काही सुटेना...काय रे या वर्षी गणपतीला गावी येतोयस ना? असा आपुलकीने प्रश्न विचारणारे आजी आजोबा नातवंडांची वाट बघत   अंगणात डोळे लावून बसलेले असतात...बसणारच कारण वर्षभराने नातवंडांचा किलबिलाट पुन्हा अंगणात ऐकायला मिळणार असतो...आपल्या लाडक्या नातवंडांची चांगली खतीरदारी व्हावी यासाठी आजीचा बटवा हा तयारच असतो... नातवंड या पाच दिवसात साऱ्या घराचा नकाशा बदलून टाकतात वर्षभर पसरलेली शांतता एका क्षणात नाहीशी होऊन जाते...नातवंडांसोबत 5 दिवसच घालवायला मिळणार हे आजी आजोबांना माहीत असतं पण या 5 दिवसांच्या आठवणी संपूर्ण वर्षभर त्यांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करतो...आणि हा गोडवा कायम राहावा यासाठी आजी आजोबा आपल्या हृदयावर दगड ठेऊन नातवंडांची वर्षभर वाट पाहत...

पुन्हा बहरुदे कोकण माझा....

Image
कोकण....असा प्रदेश जिथे निसर्गाचा बहुमूल्य ठेवा आहे...असा प्रदेश जिथे येणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेची पारडी फेडली जातात...कोकण असा प्रदेश जो निसर्गाने परिपूर्ण आहे...कोकणातल्या निसर्गाचा हेवा तर प्रत्येकाला आहे...दऱ्या खोऱ्या नद्या आणि अथांग समुद्र सोबतच हिरवा निसर्ग म्हणजे कोकण...पण निसर्गाचा वारसा लाभलेल्या या कोकणाला कोणाची तरी नजर लागली..शुद्ध हवा आणि निसर्गाचा आनंद लुटायला येणाऱ्या पर्यटकांची पावलं हळू हळू कमी झाली...कोकणाच्या वैभशाली निससर्गाचं कौतुक संपूर्ण जगप्रसिद्ध आहे...750 किलोमीटर पसरलेली अथांग समुद्र किनारपट्टी आणि सोबतीला दऱ्या खोऱ्या...घाटमाथ्यावरून वाहणाऱ्या नद्यांचा उगम आणि सोबतच खळखळ वाहणारे धबधबे ही कोकणची शान... पण या कोकणाच्या निसर्गाला जखडलंय ते MIDC च्या केमिकल युक्त सांडपाण्याने...नद्या वाहतात खऱ्या पण त्यातून विसर्ग होतो तो रसायन मिश्रित पाण्याचा..ज्यांचा उदरनिर्वाह संपूर्ण मासेमारीवर आहे त्यांच्यासाठी आता धोक्याची घंटा वाजतेय आणि येणाऱ्या काळात पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली मासेमारी आता नष्ट होणार का असा प्रश्न निर्माण झालाय..कोकणचा निसर्ग ह...

सोडा ना कुणास काय फरक...

Image
निजलो शांत जरी सरणावरती उराशी कवटाळले त्या ज्वालानी  व्यक्त व्हायचे गेले राहुनी... सोडा ना कुणास काय फरक झिजून गेली जिंदगी सारी...  काढली काळाने पारध अशी जणू चोर पोलिसांचीच कहाणी... सोडा ना कुणास काय फरक... अंतयात्रेत जमला गोतावळा जसा  सर्वत्र पसरला पसारा जसा.. सोडा ना कुणास काय फरक.. डोळ्यात दाटले अश्रू सर्वांच्या वाटते जणू उरलेली ती फक्त औपचारिकता  सोडा ना कुणास काय फरक... कुठलं स्वर्ग आणि कुठलं नरक अस्तित्व टिकलं तर बरं,  नाहीतर कुणास काय फरक...

नवसंजीवनी...

Image
हनुमान  ऊर्फ  मारुती  ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. मारुतीच्या अनेक शौर्य गाथा अजूनही आजही अनेकांच्या मनात कोरल्या गेल्यात...ज्यावेळी रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि लंकेला घेऊन गेला त्यावेळेस सीतेला परत आणण्यासाठी वानरसेना सज्ज झाली..सीतेला परत आणण्यासाठी अनेक आव्हानं रामासमोर उभी ठाकलेली... सर्व आव्हानांना सामोरं जाण्यासाठी रामसोबत खंबीर पणे उभा होता तो हनुमान... ज्यावेळी रावण आणि राम यांच्यात युद्ध घडलं त्यावेळी लक्ष्मणाला बाण लागला आणि तो बेशुद्ध पडला , सर्व देव ऋषीमुनी एकजूट झाले परंतु कोणालाच लक्ष्मणाला शुद्धीवर आणता आलं नाही...सर्व देव तिथे उपस्थितीत असूनही एकाही देवाला लक्ष्मणाला शुद्धीवर आणणं जमलं नाही..तेव्हड्यात एक ऋषी उठले आणि त्यांनी उत्तरेच्या बाजूला द्रोणागिरी पर्वत आहे त्यावर मिळणारी संजीवनी हीच लक्ष्मणाला वाचवू शकते असं सांगितलं हनुमानाने कुठलाही विचार न करता लगेच उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्...

खेळ प्रश्न उत्तरांचा...

खेळ प्रश्न उत्तरांचा नाती गोती दूर लोटली गेली स्वार्थापायी आपलीच माणसं दूर गेली कधी आपलं,आपण ,आमचं म्हणणारे आज माझं म्हणायला लागले विसर पडला त्यांना जे अडचणीत त्यांच्या सोबत आले विसरून ते दिवस आपला स्वार्थ पाहू लागले काय सांगावं त्यांना जे माणुसकीच हरवून बसले  आदळणाऱ्या लाटांचा स्पर्श जेव्हा किनाऱ्याला होतो,त्या किनाऱ्याच्या वेदना पाहून समुद्र पण ओहटीची भूमिका घेतो  हल्ली माणसाला माणूस म्हणून कोण नाही पहात त्याची फक्त पाहिली जाते जात Sign of true love म्हणून ताजमहल ला पाहिलं जातं Sign of friendship म्हणून राधा कृष्णाचं नातं का लपवलं जातं?  समोरच्याच्या भावना आपण दुखवतो त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायला आपण कधी जातो? समोरच्याच्या चुकीवर आपण त्याला तत्वज्ञान शिकवतो आपली चूक आपण कधी मान्य करतो?  आपल्याला गरज असते तेव्हा समोरच्याला आपण मस्का मारतो समोरच्याला गरज भासते तेव्हा आपण त्याला फाट्यावर मारतो....

विठुराया रुसलास की काय???

प्रिय विठुराया, पत्रास कारण की ... विचारपूस करावी म्हटलं , काय रे विठुराया रुसलास कि काय , यांदा वारी चुकली म्हणून रागावलास कि काय...? नाही जमलं रे यंदा यायला तुझ्या दारी , कोरोना पायी बंद  झाली देवळं सारी...सावळं तुझं रूप पाहण्या थांबतो वर्षभर जरी, यंदा मात्र चुकली तुझी हि वारी...नामघोषात दुमदुमते तुझी पंढरी ,यंदा मात्र सुनी झाली तुझी हि नगरी...तुझा गजर थांबला,तुझ्या नामाचा टाळहि हुकला..अरे सावळ्या विठूराया यंदा वारीचा हा सारा खेळहि फसला...पिढ्यां- पिढ्याची परंपरा आज मात्र खुंटली, तुझी वारी चुकली हि गोष्ट आम्हला नाही पटली...जशी ओढ लेकराला त्याच्या माय बापाची तशी ओढ आम्हा वारकर्यांना तुझी... यंदाच्या वारीचा योग चुकला आणि हा वारकरी तुझा रस्ता मुकला...तूच बाप बंधू तूच सखा , जगाचा कैवारी तू युगे युगे विटेवर उभा...पंढरपूर हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यसमोर उभी राहते ती चंद्रभागा ,वाळवंटात जमलेलो आम्ही वारकरी , आठवते ती पायी निघालेली वारी... शेकडो वारकरयांचा प्रवास , प्रत्येकाच्या ओठी फक्त तुझं नाव...पंढरीच आहे आम्हा वारकऱ्यांचं गाव...एकदा का तुझी वारी सुरु झाली कि तुझा नाद घुमू लागतो , माउल...