Posts

भेट.....

Image
नशिबात काय वाढलेलं असतं हे कोणालाच ठाऊक नसतं...कधी कसं केव्हा कुठे कोणाची भेट होईल हे ही सांगता येत नाही... असच काहीसं माझ्या आणि तिच्या बाबतीत घडलं असावं....2 वर्षांपूर्वी आमची शेवटची भेट झाली वाटलं नव्हतं की पुन्हा आम्ही कधी भेटू...कारण माझ्या एका चुकीमुळे आम्ही दोघं पण लांब गेलो...यात तिची काही चूक नव्हती... म्हंटले आता पुन्हा आमची भेट होणे नाही.... 2 दिवसांपूर्वी अचानक तिचा फोन आला,मी जरा विचारात पडलो की आज कसा काय हीचा फोन आला....आणि 2 वर्षांपूर्वी संपलेला संवाद पुन्हा सुरू झाला...तिचा आवाज ऐकताच जरा हिरमुसून गेलो कशासाठी फोन केला हे कळण्याआधीच मनात विचार आला की लग्नाचं आमंत्रण तर नसेल ना मी काही बोलण्याआधी समोरून तिनेच विचारलं कुठे आहेस मी शांतपणे म्हंटले गावी आहे...मी गावी आहे ऐकताच ती तारकर्ली मध्ये आहे असं सांगितलं मी विचार न करता भेटुयात असं म्हटलं खरतर माझ्या गावापासून तारकर्ली 270 किलोमीटर वर आहे...कसला ही विचार न करता मी थेट तिला भेटायला गेलो.... साडे चार तासांच्या प्रवासात तिचेच विचार मनात येत होते... म्हंटले भेटून सगळं तिला सांगावं....पण तिची भेट झाल्यानंतर स...

जातकारण....

सर्वप्रथम माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी काही ही संबधंध नाही..... काल पासून एक भाषण जोरदार गाजतय...टीका टिप्पणी ही सुरू झालीय...राजकीय वर्तुळातही त्याचा प्रभाव पाहायला मिळतोय...अनेक पक्ष स्वार्थासाठी एक होतात आणि त्या स्वार्थापोटी चिरडला जातोय तो सामान्य माणूस.... जातीयवाद कधी संपेल असं वाटत नाही कारण जो पर्यंत आपण रंगावरून धर्म शोधत बसू तोपर्यंत हे वाद असेच सुरू राहणार आहेत...प्रत्येकाने एकच विचार करायला हवा की आपला देश हाच आपला धर्म आहे "भारतीय"...गर्वाने सांगतो की अभिमान आहे भारतीय असल्याचा....मग हा अभिमान निवडणुकीच्या वेळी कुठे जातो...? मत मागायला हात पसरता मग जेव्हा मदत लागते तेव्हा पाठ का दाखवता? कुठल्याही धर्मावर बोलण्याचा अधिकार आपल्यातल्या कोणालाच नाही आहे...आणि हा निर्बंध संविधानाने आपल्याला घातलाय...काही विकृतांचा निषेध आपण सगळेच करतो परंतु त्यात इतर सामन्यांची काय चूक आहे...एका व्यक्तीमुळे आपण सर्वांना दोषी ठरवतो हे योग्य आहे का? परप्रांतीय आपल्या राज्यात येतात याचा राग द्वेष संताप दाखवता,अरे ते लोक आपल्या राज्यात येऊन धंदा करू शकतात मग आपण का नाही करू शकत याची लाज...

'इतिहास' इतिहास जमा....?

इ.स 6 जून १६७४ रोजी   स्वराज्याची स्थापना झाली...मुघलांच्या दडपशाही विरोधात अनेकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला... वेदशी व्यापारी भारतात येऊन व्यापार करण्याच्या हेतूने आले.परंतु त्यांचा हेतू व्यापार करण्याचा नव्हताच कधी...हेतू होता तो फक्त राज्य करण्याचा....अफगाणी, पोर्तुगीज, मुघल सलतनत सर्वांची भारतावर नजर होती... 17 व 18 वे शतक म्हणजे महाराष्ट्रातील योद्यांच्या पराक्रमाची गाथा म्हटली जाते.नरवीर तानाजी मालुसरे,कोंडाजी फर्जंद,रायाजी बांदल,बहिर्जी नाईक,बाजीप्रभू देशपांडे,फुलाजीप्रभू देशपांडे,जीवा महाला,शिवा काशिद असे कित्येक अगणीक सूर्य या मराठी मातीत सूर्योदयाला आले...प्रत्येकाचा एकच ध्यास ' स्वराज्य '... प्रत्येक जण झटला तो मराठी अस्मिता जागी आणि जिवंत ठेवण्यासाठी.... आऊ जिजाऊंच्या स्वप्नाला खरं ठरवण्यासाठी प्रत्येक मावळा आपल्या राजाच्या खांद्याला खांदा लावून तयारच होता... स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्याने त्याचा जीव राज्यांसाठी ओवाळून टाकला होता.... 19 फ्रेबुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज या क्रांतीसूर्याचा जन्म झाला. शिवबाच्या जन्माने साडेतीनशे वर्षांच्या काळ्या...

जायचं कुठे होतं,आणि जातोय कुठे?

Image
जायचं कुठे होतं, आणि जातोय कुठे? इतरांना वाचण्यात गुंग होतो, स्वतःलाच वाचायला वेळ मिळतोय कुठे? कारण जायचं कुठे होतं, आणि जातोय कुठे? नाराज तर सर्वांसोबत आहेच मी, पण नाराजी व्यक्त करतोय कुठे? कारण जायचं कुठे होतं, आणि जातोय कुठे? काही गमावलेच नाही आयुष्यात, कारण गमवयला कमावलच कुठे? कारण जायचं कुठे होतं, आणि जातोय कुठे? हसणाऱ्या देहाला कसली दुखांची फिकीर, दुःख व्यक्त करायला माणुसकीच उरलि कुठे? कारण जायचं कुठे होतं, आणि जातोय कुठे? _प्रथमेश महाडिक

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...

Image
वर्षाचा सण ह्यो कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा...जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेला चाकरमानी गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो...आपल्या लाडक्या बाप्पाला वर्षानी भेटायचा योग असतोच पण कुटुंब एकत्र येऊन सण साजरा होणार याचा आनंद जास्त असतो...गावखेड्यातला पोर शहरात गेलं मुंबई पुणे अहो एवढंच काय तर सातासमुद्रापलिकडे गेलं...तरी त्याला गावची ओढ काही सुटेना...काय रे या वर्षी गणपतीला गावी येतोयस ना? असा आपुलकीने प्रश्न विचारणारे आजी आजोबा नातवंडांची वाट बघत   अंगणात डोळे लावून बसलेले असतात...बसणारच कारण वर्षभराने नातवंडांचा किलबिलाट पुन्हा अंगणात ऐकायला मिळणार असतो...आपल्या लाडक्या नातवंडांची चांगली खतीरदारी व्हावी यासाठी आजीचा बटवा हा तयारच असतो... नातवंड या पाच दिवसात साऱ्या घराचा नकाशा बदलून टाकतात वर्षभर पसरलेली शांतता एका क्षणात नाहीशी होऊन जाते...नातवंडांसोबत 5 दिवसच घालवायला मिळणार हे आजी आजोबांना माहीत असतं पण या 5 दिवसांच्या आठवणी संपूर्ण वर्षभर त्यांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करतो...आणि हा गोडवा कायम राहावा यासाठी आजी आजोबा आपल्या हृदयावर दगड ठेऊन नातवंडांची वर्षभर वाट पाहत...

पुन्हा बहरुदे कोकण माझा....

Image
कोकण....असा प्रदेश जिथे निसर्गाचा बहुमूल्य ठेवा आहे...असा प्रदेश जिथे येणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेची पारडी फेडली जातात...कोकण असा प्रदेश जो निसर्गाने परिपूर्ण आहे...कोकणातल्या निसर्गाचा हेवा तर प्रत्येकाला आहे...दऱ्या खोऱ्या नद्या आणि अथांग समुद्र सोबतच हिरवा निसर्ग म्हणजे कोकण...पण निसर्गाचा वारसा लाभलेल्या या कोकणाला कोणाची तरी नजर लागली..शुद्ध हवा आणि निसर्गाचा आनंद लुटायला येणाऱ्या पर्यटकांची पावलं हळू हळू कमी झाली...कोकणाच्या वैभशाली निससर्गाचं कौतुक संपूर्ण जगप्रसिद्ध आहे...750 किलोमीटर पसरलेली अथांग समुद्र किनारपट्टी आणि सोबतीला दऱ्या खोऱ्या...घाटमाथ्यावरून वाहणाऱ्या नद्यांचा उगम आणि सोबतच खळखळ वाहणारे धबधबे ही कोकणची शान... पण या कोकणाच्या निसर्गाला जखडलंय ते MIDC च्या केमिकल युक्त सांडपाण्याने...नद्या वाहतात खऱ्या पण त्यातून विसर्ग होतो तो रसायन मिश्रित पाण्याचा..ज्यांचा उदरनिर्वाह संपूर्ण मासेमारीवर आहे त्यांच्यासाठी आता धोक्याची घंटा वाजतेय आणि येणाऱ्या काळात पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली मासेमारी आता नष्ट होणार का असा प्रश्न निर्माण झालाय..कोकणचा निसर्ग ह...

सोडा ना कुणास काय फरक...

Image
निजलो शांत जरी सरणावरती उराशी कवटाळले त्या ज्वालानी  व्यक्त व्हायचे गेले राहुनी... सोडा ना कुणास काय फरक झिजून गेली जिंदगी सारी...  काढली काळाने पारध अशी जणू चोर पोलिसांचीच कहाणी... सोडा ना कुणास काय फरक... अंतयात्रेत जमला गोतावळा जसा  सर्वत्र पसरला पसारा जसा.. सोडा ना कुणास काय फरक.. डोळ्यात दाटले अश्रू सर्वांच्या वाटते जणू उरलेली ती फक्त औपचारिकता  सोडा ना कुणास काय फरक... कुठलं स्वर्ग आणि कुठलं नरक अस्तित्व टिकलं तर बरं,  नाहीतर कुणास काय फरक...