Posts

धाव...

मुंबईतला पाऊस म्हणजे फक्त ऋतू नसतो... तो रोजच्या जगण्याची परीक्षा असतो. सकाळी डोळे उघडताच पहिली नजर खिडकीबाहेर जाते. पाऊस कोसळत असतो आणि मनात पहिला प्रश्न येतो, "आज लोकल वेळेवर असेल ना?" कारण आमच्यासारख्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी दिवस घड्याळाच्या काट्यावर सुरू होतो. हातात छत्री, पाठीवर लॅपटॉपची बॅग आणि मनात वेळेचं ओझं घेऊन घराबाहेर पडतो. रस्त्यावर पाण्याचे डोह, बसस्टॉपवर गर्दी आणि स्टेशनकडे धावणारे हजारो चेहरे... प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भावना असते – आज ऑफिसला उशीर होता कामा नये. स्टेशनवर पोहोचल्यावर खरी शर्यत सुरू होते. प्लॅटफॉर्मवर उभं राहून येणाऱ्या प्रत्येक लोकलकडे नजरा लागलेल्या असतात. ट्रेन आली की क्षणभर वाटतं, ही लोकल नाही... तर आयुष्याची पुढची संधी आली आहे. आत शिरण्यासाठी होणारी धडपड, कोणीतरी हात देऊन आत ओढणं, तर कोणीतरी स्वतःचा तोल सावरत दुसऱ्याला जागा करून देणं... मुंबईकरांचा हा न बोलता समजणारा स्वभाव प्रत्येक पावसाळ्यात नव्याने अनुभवायला मिळतो. खिडकीबाहेर पावसाचे थेंब धावत असतात आणि आत मोबाईलवर ऑफिसचे मेसेज. "Where are you?" "ETA?" "Cl...

स्वतःला ओळखण्याचा प्रवास

"काय गंमत असते ना, स्वतःला ओळखायला देखील स्वतःशी प्रामाणिक असणं गरजेचं असतं हे वेळ गेल्यावर कळतं आणि जेव्हा कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो." जीवनातील काही सत्यं अशी असतात की ती आपल्याला कोणत्याही पुस्तकात सापडत नाहीत. ती अनुभवातून शिकावी लागतात. स्वतःला ओळखणं हे त्यापैकीच एक सत्य आहे. आपण आयुष्यभर अनेक नाती जपतो, अनेक लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न मात्र अनेकदा राहून जातो. आपण अनेकदा इतरांच्या अपेक्षांप्रमाणे जगत असतो. समाज काय म्हणेल, लोक काय विचार करतील, आपल्याकडून काय अपेक्षा आहेत याच विचारात आपण इतके गुंतून जातो की आपल्या मनाचा आवाज ऐकायलाच विसरतो. हळूहळू आपण स्वतःपासूनच दूर जाऊ लागतो. आपल्या इच्छा, स्वप्नं, आवडी-निवडी आणि भावनांवर मुखवटा चढवतो. त्या मुखवट्यालाच आपलं खरं रूप समजू लागतो. पण काळ हा मोठा शिक्षक असतो. एखाद्या शांत क्षणी, एखाद्या अपयशानंतर, एखाद्या नात्याच्या तुटण्याने किंवा आयुष्याच्या वळणावर अचानक आपल्याला प्रश्न पडतो — "मी खरोखर कोण आहे?" आणि तेव्हा जाणवतं की आपण स्वतःशी कधीच प्रामाणिक नव्हतो. स्वतःशी प्रा...

वाचकांचा अभिप्राय… आपुलकीची थाप!

लेखन म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते… ते मनातून उमटलेल्या भावनांचं प्रतिबिंब असतं. कधी आयुष्यातल्या संघर्षाची कहाणी, कधी नात्यांमधली ओल, तर कधी समाजात घडणाऱ्या वास्तवाची जाणीव… मी प्रत्येक परिस्थितीला अनुसरून लेख लिहित गेलो, आणि नकळत माझ्या मनात साचलेल्या भावना त्या शब्दांत उतरू लागल्या. सुरुवातीला वाटायचं, हे लेख फक्त माझ्या मनापुरते मर्यादित राहतील. पण जेव्हा वाचकांनी त्या शब्दांमध्ये स्वतःचं आयुष्य पाहिलं, स्वतःच्या भावना अनुभवल्या, तेव्हा समजलं की लेखणीचं खरं सामर्थ्य काय असतं. माझ्या प्रत्येक लेखावर आलेला अभिप्राय हा केवळ प्रतिक्रिया नव्हता… ती होती आपुलकीची थाप! “तुमचा लेख मनाला भिडला…” “हे शब्द अगदी माझ्यासाठीच लिहिल्यासारखे वाटले…” असे अनेक संदेश माझ्यासाठी प्रेरणेचं इंधन बनले. कधी एखाद्या वाचकाच्या डोळ्यात पाणी आणणारा लेख, तर कधी कोणाला पुन्हा उभं राहण्याची हिंमत देणारे शब्द… हे सगळं पाहताना जाणवलं की, लेखन फक्त छंद राहिलेलं नाही, तर ते अनेक भावनांना जोडणारं माध्यम बनलं आहे. प्रत्येक अभिप्राय मी निरखून पाहिला… त्यातून चुका समजल्या, नवीन दिशा मिळाली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हण...

कोकण…भूभाग नाही, श्वास आहे!

कोकण म्हटलं की मनात सर्वप्रथम उभा राहतो तो अथांग निळाशार समुद्र… नारळी-पोफळीच्या बागांमधून अलगद वाहणारा वारा… मातीतून दरवळणारा पावसाचा सुगंध… आणि कौलारू घरांच्या ओट्यावर बसलेली माणसं… कोकण म्हणजे फक्त पर्यटनस्थळ नाही… तो एक जिवंत संस्कार आहे. एक अशी जीवनशैली, जिथे माणूस निसर्गाशी भांडत नाही… तर त्याच्यासोबत जगतो. पहाटे कोंबड्याच्या आरवण्याने जाग येते, समुद्राच्या लाटांमध्ये दिवस सुरू होतो, आणि रात्री काजव्यांच्या प्रकाशात गाव शांत झोपतं… हे सगळं आजही कोकणात कुठेतरी श्वास घेतंय. पण… हा श्वास आता धाप लागल्यासारखा वाटतोय. एक काळ होता… जिथे समुद्रकिनाऱ्यावर खेकड्यांच्या रांगा दिसायच्या, झाडांवर पक्ष्यांची घरटी असायची, आणि जंगलातल्या प्रत्येक वाटेला स्वतःचा आवाज असायचा. आज त्या वाटा शांत झाल्यात… कारण विकासाच्या नावाखाली आपण निसर्गालाच गुदमरवायला सुरुवात केली. डोंगर पोखरले गेले… झाडं तोडली गेली… नद्या दूषित झाल्या… आणि समुद्रही आता आधीसारखा नितळ राहिला नाही. ज्याला आपण “जैवविविधता” म्हणतो ना… ती कोकणाची खरी ओळख होती. आंब्याच्या बागांमध्ये गुणगुणणाऱ्या मधमाशा, पावसात ओरडणारे बेडूक, रात्री चम...

परंपरेच्या विळख्यात अडकलेली "कुस "

आज तिची कुस उतावीळ झाली होती… एवढ्या दिवसांनी लेकराला कवटाळायचं होतं तिला… जणू तिच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक ठोक्यात फक्त एकच हाक होती — “माझं लेकरू…” पण… एक क्षण… फक्त एक क्षण… कावळा शिवला म्हणे. आणि सगळं बदललं. ज्या हातांनी जन्म दिला, ज्या कुशीत त्या लेकराने पहिल्यांदा डोळे उघडले, ज्या उबेत त्याने जग ओळखलं… त्या कुशीला आज “अपवित्र” ठरवलं गेलं. ती उभी होती… डोळ्यांत अश्रू, ओठांवर थरथर… पण आवाज मात्र नाही. कारण आवाज दाबायला तिला शिकवलं गेलं होतं — “हीच परंपरा आहे…” लेकरू रडत होतं… आईच्या गंधासाठी… आईच्या स्पर्शासाठी… पण त्याला दूर नेलं गेलं. आईचं हृदय ओरडत होतं — “मला दे माझं लेकरू… कुठला कावळा? कुठली अपवित्रता? मी आई आहे… माझं प्रेम कधी अपवित्र होऊ शकतं का?” पण तिच्या प्रश्नांना उत्तर नव्हतं… फक्त शांतता होती… आणि त्या शांततेत दडलेला निर्दयी समाज. ती बघत राहिली… तिच्या हातातून निसटलेलं ते छोटंसं जग… तिच्या कुशीपासून दूर होत गेलेलं तिचं सगळं अस्तित्व… त्या क्षणी… ती फक्त आई नव्हती… ती एक वेदना झाली होती… जिला ना आवाज होता, ना न्याय. परंपरा… चालीरीती… यांना जपताना आपण इतके अंध झालोय...

बाळ… आईचं दुसरं आयुष्य

आई… हा शब्द उच्चारला की मनात एक उबदार स्पर्श जाणवतो. पण आई होणं म्हणजे फक्त एक नातं नाही—तो तिच्या आयुष्याचा एक नवा जन्म असतो. ती आधीही जगत असते… स्वप्नं बघत असते, हसत-खेळत असते, स्वतःसाठी जगत असते. पण एक दिवस… तिच्या हातात एक छोटंसं बाळ येतं, आणि त्या क्षणापासून तिचं सगळं आयुष्य बदलून जातं. बाळ म्हणजे तिचं दुसरं आयुष्य… त्या छोट्या जीवाच्या पहिल्या रडण्याबरोबर, आईचं जुनं आयुष्य शांतपणे मागे सरकतं… आणि एक नवं आयुष्य सुरू होतं—पूर्णपणे त्या बाळासाठी. रात्रभर जागणं, स्वतःची भूक विसरणं, स्वप्नं बाजूला ठेवणं… हे सगळं ती सहज करत असते. कारण तिच्यासाठी आता तिचं “मी” संपलेलं असतं… आणि “आपण” सुरू झालेलं असतं. कधी कधी ती थकतेही… कधी आरशात स्वतःकडे बघते… आणि विचार करते— “मी पूर्वीसारखी का दिसत नाही?” तिच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं, ओठांवरचं अर्धवट हसू, आणि मनातली थोडीशी हरवलेली ती… हे सगळं ती स्वतःमध्येच लपवते. कारण तिच्या हातातलं बाळ तिच्याकडे बघून हसतं… आणि त्या एका हसण्यात ती पुन्हा जगायला शिकते. आईचं प्रेम… निस्वार्थ असतं ती बाळाला चालायला शिकवते… पण स्वतःचे पाय मागे घेते. ती त्याला उंच उडा...

"अमृतवाणी"

“अमृतवाणी” — हा फक्त शब्द नाही… ही आपल्या प्रत्येकाच्या छातीत धडकणारी एक भावना आहे. आईच्या ओंजळीतून मिळालेल्या पहिल्या शब्दाची, अंगाईगीताची, आणि आयुष्यभर सोबत करणाऱ्या संस्कारांची ही ओळख आहे. मराठी… ही फक्त भाषा नाही. ही आपल्या अस्मितेची खूण आहे. ही आपल्या स्वाभिमानाची तलवार आहे. आणि ही आपल्या महाराष्ट्राच्या कर्तृत्वाची जिवंत साक्ष आहे. आपण जन्मलो तेव्हा पहिला उच्चार “आई” होता… आणि त्या “आई”मध्येच मराठी होती. तिच्या कुशीत आपण वाढलो, तिच्या शब्दांतून आपण जग समजलो. पण कधी विचार केलाय का… ही भाषा इतकी समृद्ध कशी झाली? कारण… ही भाषा फक्त बोलली गेली नाही, ती जगली गेली आहे. तीच्यासाठी अनेकांनी लढा दिला… रक्त सांडलं… स्वप्नं तुटली… पण मराठीचा झेंडा कधी खाली पडू दिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, ते केवळ भूमीचं नव्हतं… ते संस्कृतीचं आणि भाषेचंही स्वराज्य होतं. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, संत नामदेव, बहिणाबाई, संत एकनाथ अशा अनेक संतांनी अभंगातून मराठीला आत्मा दिला… आणि पुढे अनेक लेखक, कवी, विचारवंतांनी तिला विचारांची उंची दिली. आपण सगळ्यांनी एक गाणं ऐकलंय… “लाभले आम्हा...

पाझर...

कधी कधी जखमा दिसत नाहीत… पण त्या सतत झिरपत राहतात. जणू काही मनाच्या भिंतीतून “पाझर” फुटलेला असतो… आईच्या जुन्या साडीत अजूनही तिचा वास आहे… त्या कपाटात हात घातला की आठवणींचा पाझर आपोआप डोळ्यात येतो. ती साडी काढताना वाटतं, जणू आई म्हणतेय – "काय रे, एवढा मोठा झालास… पण अजूनही रडतोस का?" आणि तेव्हा कळतं… मोठं होणं म्हणजे रडणं थांबवणं नाही… तर रडणं लपवणं आहे. बाबांच्या खिशात कधीच पैसे नसत… पण माझ्यासाठी त्यांनी कधी “नाही” म्हटलं नाही. आज माझ्या खिशात पैसे आहेत… पण बाबांचा हात धरायला ते नाहीत… हीच तर ती पाझरलेली वेदना आहे… जिला शब्द नसतात… पण डोळे सगळं सांगतात. एक मित्र होता… ज्याच्यासोबत सगळं शेअर करायचो… आज तो online असतो, पण आपल्यासाठी offline… त्याच्या “last seen” मध्येच आपल्या नात्याचा शेवट दिसतो… त्या चॅटमध्ये अजूनही “typing…” ची वाट पाहताना, मनाच्या आत कुठेतरी एक पाझर फुटतो… आणि ती… जिच्यासोबत आयुष्याचं स्वप्न रंगवलं होतं… ती आज कुणाच्या तरी नावाने हसतेय… आणि आपण… तिच्या आठवणींना धरून अजूनही जगतोय… किती विचित्र आहे ना… तिच्या एका “Goodbye” ने आपल्या आयुष्याचा “Pause” बटन दाब...

रुक्मिणीच्या नजरेतून पाहिलेला विठ्ठल…

पंढरपूरचा तो पहाटेचा क्षण… चंद्र अजूनही आकाशात थांबलेला, आणि भीमा नदीच्या पाण्यावर त्याचं प्रतिबिंब हलकेच थरथरत होतं. मंदिराच्या कळसावरून पहाटेची पहिली किरणं उतरू लागली… आणि मी — रुक्मिणी — शांत उभी होते… त्याच्याकडे पाहत. तोच तो… माझा विठ्ठल. पांडुरंग… जगाचा देव, पण माझ्यासाठी? फक्त माझा सखा… माझं सगळं काही. लोकांच्या ओठांवर "विठ्ठल विठ्ठल" चा गजर चालू होता… पण माझ्या मनात मात्र एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उमटत होता — "हा सगळ्यांचा आहे… पण खरंच माझा आहे का?" तो विटेवर उभा… हात कमरेवर ठेवून… जणू प्रत्येक भक्ताची वाट बघत. मी त्याच्याकडे बघते… आणि अचानक लक्षात येतं — त्याच्या डोळ्यांत मी नाही… त्याच्या डोळ्यांत तर सगळं जग आहे. एक आई आपल्या लेकरासाठी रडतेय… एक वारकरी हजारो किलोमीटर चालत आलाय… एक गरीब मनुष्य फक्त एकच मागतोय — “देवा, पोटभर अन्न दे…” आणि तो? तो सगळ्यांना ऐकतोय… सगळ्यांना पाहतोय… सगळ्यांना समजून घेतोय. क्षणभर माझ्या मनात एक हळवी वेदना उमटते… "माझ्यासाठी वेळ आहे का त्याच्याकडे?" मी रुक्मिणी… त्याची अर्धांगिनी… पण आज मला वाटतंय, मीही त्या गर्दीतलीच एक...

काकण...

गावातल्या त्या जुन्या वाड्यात अजूनही एक शांतपणा होता… पण त्या शांततेतही एक वेदना लपलेली होती. सईचं लग्न झालं होतं. हातात हिरव्या काचांच्या काकणांचा गोड खणखणाट, कपाळावर कुंकू, आणि डोळ्यांत स्वप्नांची दुनिया… आईने तिच्या हातात काकण घालताना म्हटलं होतं, “हे काकण फक्त शोभेसाठी नाहीत ग बाळा… हे तुझ्या संसाराचं सौख्य आहेत… जपून ठेव.” पहिल्या काही दिवसांत सगळं स्वप्नासारखं होतं… पण हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. नवऱ्याचा स्वभाव बदलायला लागला… शब्द कठोर झाले… आणि कधी कधी हातही उठू लागले… त्या रात्री… सई स्वयंपाकघरात उभी होती. डोळ्यांत अश्रू, पण ओठांवर शांतता… कारण तिला शिकवलं होतं – “सहन कर, संसार टिकव.” अचानक जोरात आवाज झाला… काकण फुटलं. तिच्या हातातून रक्त वाहू लागलं… पण ती वेदना तिच्या जखमेपेक्षा कमी होती. जास्त वेदना झाली ती त्या तुटलेल्या काकणांची… कारण ते फक्त काच नव्हते… तिच्या स्वप्नांचे तुकडे होते. दुसऱ्या दिवशी ती आईच्या घरी आली. आईने तिचा हात पाहिला… जखमा, ओरखडे… आणि तुटलेलं काकण… आईच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ती काही बोलली नाही… फक्त सईचा हात हातात घेतला आणि म्हणाली— “हे काकण मी तु...

तिचा तो एक मेसेज...

"एका ‘Hi’ पासून सुरू झालेलं आयुष्य..." कधी कधी आयुष्य खूप साध्या गोष्टींनी बदलतं… ना कुठला मोठा प्लॅन, ना कुठली तयारी… फक्त एक छोटंसं "Hi"… आणि सगळं काही बदलून जातं. आम्ही दोघं… अगदी अनोळखी. नाव माहिती नव्हतं, चेहरा माहिती नव्हता… फक्त एक "Hi छान लिहितोस तू ब्लॉग्स मस्त असतात"…  तेव्हाच कळलं नव्हतं… की हा Hi एक दिवस आयुष्याचा आधार बनेल. मला लिहायची प्रचंड आवड… शब्द माझं जग होतं, भावना माझं घर. पण त्या शब्दांना अर्थ द्यायला कोणीतरी हवं होतं… आणि ती आली… एक वाचक म्हणून. ती माझे ब्लॉग वाचायची… आणि प्रत्येक वेळी काहीतरी असं लिहायची, ज्यामुळे मला वाटायचं— "कोणीतरी आहे… जो मला समजून घेतोय." हळूहळू माझं लिखाण बदलायला लागलं… शब्द अधिक खोल झाले… कारण ते फक्त कागदावर उतरलेले नव्हते, ते तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत होते. दिवस सरत गेले… आणि आमचं बोलणंही बदलत गेलं… "Hi" वरून "Good Morning"… "Take Care" वरून "Good Night Babe" पर्यंत. पण हे सगळं इतकं सहज घडलं… की कधी तिचं अस्तित्व माझ्या आयुष्याचा भाग बनलं, हे मला कळल...

उंबरठा...

उंबरा… साधा शब्द. पण काही उंबरे असे असतात, जिथे पाय ठेवला की आयुष्य दोन भागांत विभागतं — आधीचं आणि नंतरचं. त्या दिवशी मी तिच्या घरासमोर उभा होतो. पाऊस नुकताच थांबला होता. मातीचा सुगंध हवेत भरून राहिला होता… पण माझ्या मनात मात्र काहीतरी कुजत होतं. हात उंबऱ्यावर ठेवला… आणि जाणवलं — थंडी. विचित्र थंडी. जणू घर नाही, एखादं स्मशानच. “ती आत आहे…” मन म्हणत होतं. पण दार अर्धवट उघडं होतं… आणि तरीही आतून एकही आवाज नाही. मी पाऊल टाकलं. घर अगदी तसंच होतं — भिंतींवर तिचे फोटो, कोपऱ्यात ठेवलेला तिचा आवडता दिवा… पण काहीतरी बदललं होतं. सगळं स्थिर… जणू वेळच थांबली होती. “तू आलास?” कानाजवळ आवाज आला. मी दचकून मागे वळलो. ती… ती माझ्यासमोर उभी होती. ओल्या केसांनी, पांढऱ्या साडीमध्ये… अगदी तशीच, जशी मला आठवते. पण एक फरक होता — तिच्या डोळ्यांत काहीच नव्हतं. ना प्रेम, ना राग… फक्त रिकामेपण. “तिची नजर दिसेनाशी…” हेच तर खरं होतं. मी काही बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द घशातच अडकले. ती हळूच हसली… “उशीर केलास…” तिचा आवाज शांत, पण आतून कापणारा. माझ्या डोक्यात आठवणींचा स्फोट झाला — शेवटचा भांडण… तिचं रडणं… आणि माझं नि...

माणुसकी खरच हरवली का???

रात्रीचे साडेअकरा… पावसाचे थेंब छपरावर पडत होते, आणि गावातल्या जुन्या विहिरीजवळ एक माणूस धापा टाकत उभा होता… “वाचवा… कुणीतरी वाचवा…!” त्याचा आवाज काळोखात विरून जात होता. त्या माणसाच्या हातात एक छोटंसं मूल होतं. रक्ताने माखलेलं. त्याचे डोळे भीतीने मोठे झालेले… पण आवाज मात्र बंद… गावातले काही लोक धावत आले. कुणीतरी टॉर्च लावला. प्रकाश पडला… आणि एक क्षण सगळे थिजले. “कोण आहे हा…?” “आपल्या गावचा नाही वाटतो…” “कुठल्या जातीचा असेल…?” तो माणूस हात जोडून विनवणी करत होता — “माझ्या मुलाला वाचवा… कृपया… हॉस्पिटलला न्यायचंय…” पण प्रश्न बदलला — “जात कोणती आहे तुझी…?” क्षणभर काळ थांबला… त्या वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. त्याने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं — “माझ्या मुलाची जात… ‘माणूस’ आहे… एवढंच माहित आहे मला…” पण तिथे उभ्या असलेल्या लोकांना ते उत्तर पुरेसं नव्हतं. कुणीतरी मागे सरकलं… कुणीतरी कुजबुजलं… “आपल्यातला नाही… हात लावू नका…” आणि त्या रात्री… पावसाचे थेंब थांबले… पण माणुसकीचं रक्त वाहत राहिलं… — दुसऱ्या दिवशी सकाळी… विहिरीजवळ शांतता होती. पण जमिनीवर सुकलेले रक्ताचे डाग… एक गोष्ट सांगत होते...

"कोऱ्या पानावर उमटलेले सावट”

:  कोऱ्या पानावर गिरवत बसलो… पण आज अक्षरं माझ्या हातून नव्हती उमटत, ती स्वतःच पडत होती… जणू काही कुणीतरी आतून लिहत होतं. शाईचा प्रत्येक थेंब थरथरत होता, कारण शब्द साधे नव्हते… ते जखमा होत्या, ज्या मी वर्षानुवर्षं लपवल्या होत्या. त्या कोऱ्या पानावर सुरुवात केली मी “मी ठीक आहे” ने… पण काही क्षणातच ओळ बदलली — “मी ठीक नव्हतो कधीच…” हात चालत होता, पण मन मागे खेचत होतं, जुन्या आठवणींच्या अंधाऱ्या कोपऱ्यात… जिथे अजूनही काही आवाज अडकलेत, कुणाचं हसू… कुणाचं रडणं… आणि माझं मौन. प्रत्येक शब्द लिहताना असं वाटत होतं, जणू मी स्वतःलाच उघडं पाडतोय… नग्न सत्यासमोर उभा आहे… जिथे खोटं लपवायला कुठलंच आच्छादन नाही. अचानक पानावर काही ओळी उमटल्या — ज्या मी लिहल्याच नव्हत्या… “तू अजूनही तिथेच अडकला आहेस, त्या एका क्षणात… जिथे सगळं संपलं होतं, आणि तू मात्र पुढे चालत राहिलास…” मी घाबरलो… कारण त्या ओळी माझ्या मनातल्या नव्हत्या, त्या माझ्या “आतल्या अंधाराच्या” होत्या… खोलीत शांतता होती, पण ती शांतता आरडाओरड करत होती… जणू भिंतींवर कुणीतरी नखांनी ओरखडे काढत होतं, आणि त्या आवाजाने माझं अस्तित्व हादरत होतं. मी पे...

“शांततेच्या पल्याड”

स्मशानाच्या शांततेत निजलो मी… जिथे शब्द संपतात, तिथूनच एक वेगळी गोष्ट सुरू होते. स्मशान… नाव ऐकताच अंगावर काटा येतो. पण त्या जागेची एक वेगळीच भाषा असते. इथे कुणी ओरडत नाही, कुणी भांडत नाही… सगळं काही इतकं शांत असतं की स्वतःचा श्वासही मोठा वाटतो. त्या शांततेत मी निजलो होतो — शरीराने नाही, पण मनाने… विचारांनी… आणि कदाचित थोडं आयुष्यानेही. त्या क्षणी जाणवलं, इथं सगळे सारखेच असतात. ना कोणी श्रीमंत, ना कोणी गरीब… ना कोणाची प्रतिष्ठा, ना कोणाचा अहंकार. जिवंतपणी ज्यासाठी आपण धावतो, झगडतो, ते सगळं इथे येऊन शून्य होतं. आणि म्हणूनच कदाचित ही शांतता इतकी खरी वाटते. माझ्या आजूबाजूला राख उडत होती… जणू काही आयुष्याच्या आठवणी हवेत विरघळत होत्या. प्रत्येक राखेच्या कणात एक कथा होती, एक नातं होतं, एक अपूर्ण स्वप्न होतं. आणि त्या सगळ्या कथा एकाच गोष्टीकडे बोट दाखवत होत्या — “शेवट सगळ्यांचा एकच असतो.” त्या शांततेत पडून राहिल्यावर, मनातले सगळे गोंधळ हळूहळू शांत होत गेले. जे प्रश्न खूप मोठे वाटत होते, ते इथे अगदी छोटे वाटू लागले. “कोण बरोबर, कोण चूक?” “कोण जिंकला, कोण हरला?” हे सगळं इथे येऊन अर्थहीन वाटू ला...

भाळीचं कुंकू… की रक्ताची सावली?

ती रोज सकाळी उठायची… आरशासमोर उभी राहायची… आणि अगदी अलगद… भाळी कुंकवाचा मळवट भरायची… पण गावात सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असायच्या… कारण — ती विधवा होती. “अगं, विधवा असूनही कुंकू लावते?” “काय गरज आहे या नाटकाची?” “काहीतरी गडबड आहे…” अशा कुजबुजीत तिचं आयुष्य गुंतलं होतं… पण ती मात्र शांत… निर्विकार… जणू काही काहीतरी जपते आहे… किंवा लपवते आहे… तिचं नाव होतं राधा. तीन वर्षांपूर्वी तिचा नवरा अनिकेत अचानक मेला… कसं मेला? कोणीच ठाम सांगू शकत नव्हतं… कोणी म्हणाले – अपघात… कोणी म्हणाले – आत्महत्या… आणि काहींच्या डोळ्यात तर एक वेगळीच भीती होती… त्या दिवशी… अनिकेतचं शव घरात आणलं तेव्हा, राधाने एकही अश्रू ढाळला नव्हता… फक्त शांतपणे त्याच्या कपाळावर हात फिरवला… आणि हळूच कुजबुजली… “मी थांबतेय… अजूनही…” गावातल्या लोकांना तेव्हा वाटलं — दुःखात बाई सुन्न झालीय… पण त्या दिवसापासून… ती रोज कुंकू लावायला लागली. एके रात्री… शेजारीण ताईने पाहिलं… राधा आरशासमोर उभी होती… पण तिच्या मागे… आरशात आणखी एक सावली दिसत होती… पुरुषाची. ताई घाबरून मागे सरकली… पुन्हा पाहिलं तर — राधा एकटीच होती. दुसऱ्या दिवशी,...

तडा... आणि उरलेल्या भेगांची गोष्ट

“तडा गेला की फक्त भेगा उरतात” — हे वाक्य ऐकायला साधं आहे, पण त्यामागे एक खोल सत्य दडलेलं आहे. आयुष्यातल्या नात्यांबद्दल, विश्वासाबद्दल आणि मनाच्या अवस्थेबद्दल बोलताना हे वाक्य अगदी अचूक बसतं. आपण एखाद्या वस्तूला जपून ठेवतो, कारण ती आपल्यासाठी महत्त्वाची असते. पण एकदा का तिला तडा गेला, की तिचं मूळ सौंदर्य, तिची ताकद आणि तिच्यावरचा विश्वास हळूहळू कमी होऊ लागतो. अगदी तसंच नात्यांबाबतही होतं. नातं कितीही घट्ट असलं, विश्वास कितीही मजबूत असला, तरी एक छोटासा तडा त्याला कायमचा बदलून टाकतो. तडा म्हणजे नेहमी मोठा धोका किंवा मोठी चूकच असावी असं नाही. कधी कधी तो छोट्याशा गैरसमजामुळेही पडतो. एखादं न बोललेलं वाक्य, एखादी दुर्लक्षित भावना, किंवा वेळ न देणं — या सगळ्यामुळेही तडे निर्माण होतात. आणि एकदा का तडा पडला, की त्यातून भेगा तयार होतात. त्या भेगा दिसतात, जाणवतात आणि सतत आठवण करून देतात की काहीतरी तुटलंय. भेगा म्हणजे केवळ तुटलेपण नाही, तर त्या अनुभवांचं चिन्ह असतात. त्या आपल्याला शिकवतात — विश्वास जपायला, शब्द विचारपूर्वक वापरायला, आणि नात्यांना वेळ द्यायला. कारण तडा गेला की भेगा उरतात, पण त्या भ...

विणता विणता गुंतले धागे…

विणकाम म्हणजे फक्त धाग्यांना एकत्र आणणं नसतं, तर ते असतं भावना, आठवणी आणि नात्यांना आकार देण्याचं एक सुंदर माध्यम. प्रत्येक धागा जसा वेगळा, तसंच आयुष्यही. पण हे सगळं विणताना, कधी कधी असे क्षण येतात की धागे सरळ न जाता गुंतायला लागतात… “विणता विणता गुंतले धागे…” ही ओळ फक्त विणकामापुरती मर्यादित राहत नाही, ती आपल्याला आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब दाखवते. आपण सगळेच आपल्या आयुष्याचं एक सुंदर वस्त्र तयार करत असतो. स्वप्नांचे, नात्यांचे, अपेक्षांचे आणि आठवणींचे धागे हातात घेऊन आपण पुढे जातो. सुरुवातीला सगळं किती सोपं वाटतं… प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडतेय असं भासतं. पण जसं जसं आपण विणत जातो, तसं तसं काही धागे गुंतायला लागतात. कधी एखादं नातं तुटतं, कधी एखादी अपेक्षा अपुरी राहते, तर कधी स्वतःचं मनच आपल्याला समजेनासं होतं. आणि मग त्या गुंतलेल्या धाग्यांमुळे आपण थबकतो. प्रश्न पडतो – “हे सगळं इतकं अवघड का झालं?” पण खरं पाहिलं तर, त्या गुंतलेल्या धाग्यांतच आयुष्याचं सौंदर्य दडलं आहे. कारण सरळ, व्यवस्थित विणलेलं वस्त्र जसं सुंदर दिसतं, तसंच कधी कधी त्या छोट्या छोट्या गाठी, त्या वाकड्या रेषा, हे...

डोरलं तिच्या गळ्यातलं...

डोरलं तिच्या गळ्यातलं… काळे मणी त्यात ओवले… आणि त्या प्रत्येक मण्यात साठलेला होता एक संपूर्ण प्रवास — हळूहळू उलगडत जाणारा, स्पर्शाने जाणवणारा, आणि मनात खोलवर उतरून राहणारा… पहाटेच्या त्या मंद उजेडात ती आरशासमोर उभी होती. खिडकीतून आत येणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांनी तिच्या चेहऱ्यावर हलकी सोनेरी छटा चढवली होती. तिच्या बोटांनी अलगद त्या डोरल्याला स्पर्श केला… काळे मणी हलकेसे थरथरले — जणू प्रत्येक मणी तिच्याशी काहीतरी बोलायला तयार होता. ते डोरलं तिच्या गळ्यात फक्त सजलं नव्हतं… ते तिच्या श्वासांमध्ये मिसळलं होतं. त्या दिवसाची आठवण अजूनही त्या मण्यांत जिवंत होती… हलकीशी धाकधूक, मनात दडलेली भीती, आणि त्याच वेळी एक वेगळाच आनंद. तो तिच्याकडे पाहत होता — थोडा संकोचलेला, पण डोळ्यांत एक ठामपणा. जेव्हा त्याने ते डोरलं तिच्या गळ्यात घातलं, तेव्हा वेळ जणू क्षणभर थांबली… आजूबाजूचा सगळा गोंधळ दूर गेला, आणि फक्त त्या दोघांचं जग उरलं — जिथे एक न बोललेलं वचन हळूच जन्म घेत होतं. दिवस गेले, ऋतू बदलले… पण त्या काळ्या मण्यांची चमक कमी झाली नाही. कधी पावसात भिजताना ते तिच्या गळ्यावर चिकटून राहतं, थंडगार स्पर्शान...

एक दीर्घ श्वास घेतला आणि...

कधी कधी आयुष्यात आपण थांबतो… अगदी अचानक. ना कुठलं कारण, ना कुठली मोठी घटना. फक्त एक दीर्घ श्वास घेतो… आणि त्या श्वासातच आपल्याला स्वतःची जाणीव होते. आपल्याला वाटत असतं — आपण हरवलो आहोत. लोकांच्या अपेक्षांमध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये, धावपळीत… पण खरं पाहिलं तर आपण हरवलेलो नसतोच कधी. आपण फक्त इतकं करतो — स्वतःकडे पाहणं विसरतो. लहानपणी आपण स्वतःसाठी जगत होतो. जे आवडायचं ते करत होतो, मनातलं मनमोकळं व्यक्त करत होतो. पण जसजसं मोठं होत गेलो, तसतसं “लोक काय म्हणतील?” हा प्रश्न आपल्या “मला काय हवंय?” यावर भारी पडू लागला. आपण स्वतःलाच बाजूला ठेवलं. आपल्या आवडी-निवडी, स्वप्नं, भावना — सगळं कुठेतरी दडपून टाकलं. आणि मग एक दिवस असं वाटलं — “मी हरवलो आहे.” पण आज जेव्हा तो दीर्घ श्वास घेतला, तेव्हा समजलं — हरवलेलो मी नव्हतो… हरवलेली होती माझी स्वतःकडे पाहण्याची सवय. स्वतःचा शोध घेणं म्हणजे काही मोठं पर्वत चढणं नाही. तो प्रवास आहे — आपल्या मनाशी बोलण्याचा, आपल्या चुका स्वीकारण्याचा, आणि सर्वात महत्त्वाचं — स्वतःला वेळ देण्याचा. कधी एकांतात बसून स्वतःला विचारावं, “खरंच मला काय हवंय?” “मी जे करतोय, त्यात मला ...